Sharad Pawar NCP : दोन ठिकाणी मतदार नाव नोंदणी? राष्ट्रवादी शरद पवार गटाची कारवाईची मागणी!

Voter registration at two places? Demand for action : देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यांत दुहेरी नावांवरून निवडणुकीत वादंग

Deulgao Raja विधानसभा निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटीवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देत दोन ठिकाणी मतदार नाव नोंद असलेल्या व्यक्तींची नावे एकाच ठिकाणी कायम ठेवावीत आणि दुसऱ्या ठिकाणचे नाव रद्द करावे, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी नेत्यांचे म्हणणे आहे की, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा शहरांत ग्रामीण भागातून आलेल्या हजारो नागरिकांचे नाव गावाकडे आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी मतदार यादीत नोंद आहे. परिणामी अशा मतदारांना दोन ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळते. यामुळे निवडणुकांच्या निकालावर थेट परिणाम होतो.

Local Body Elections : शिंदेसेना-भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस, काँग्रेसने केली मोर्चेबांधणी

निवेदनात पुढे म्हटले आहे की, दुहेरी नोंदणीमुळे बोगस मतदानाची शक्यता वाढते. काही ठिकाणी या पद्धतीने मतदान झाल्याचे उदाहरणही पक्षाकडून दिले गेले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांचे नाव केवळ एका ठिकाणी ठेवणे अत्यावश्यक आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

या निवेदनावर माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी राजे जाधव, माजी बाजार समिती सभापती गजानन पवार, हरीश शेटे, तालुका अध्यक्ष राजेंद्र अंभोरे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, तसेच गणेश सावडे, संतोष बुरकुल, रफिक पठाण, हनीफ शहा, बाबासाहेब कासारे, बाळू शिंगणे, विष्णू रामाने, नवनाथ गोंमधरे, राजाराम खांडेभराड आदी नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Sanjay Gandhi Scheme : निवेदनानंतरही मानधन नाही, विरोधकांचे मिरवणुकीतून ठिय्या आंदोलन

या घडामोडीमुळे निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतल्या गोंधळावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुढाकार घेतल्याने महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.