Breaking

Sharad Pawar on Amit Shah : पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच

Pawar’s statement comes from political hatred : भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

Mumbai राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात वक्तव्य केले. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गृहमंत्री म्हणून देशात सुरक्षा राखण्याचे काम अमित शहांच्या नेतृत्वात होतेय. परंतु आपल्यावर टीका झाली म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने टीका करणे योग्य नाही. पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच आले आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

गृहमंत्र्यांवर व्यक्तिगत टीका करणे योग्य नाही. त्यांची तडीपारी का झाली याबाबत कोर्टाने, संबंधित यंत्रणांनी निकाल दिलेला आहे. गृहमंत्री म्हणून या देशहितासाठी अमित शहा यांनी घेतलेले निर्णय शरद पवारांच्या लक्षात आहेत कि नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

रामदास कदम यांनी केलेल्या विधानावर देखील दरेकर यांनी भूमिका मांडली आहे. रामदास कदम हे ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत नेता म्हणून काम करताहेत. स्वाभाविकपणे त्यातून त्यांची मागणी आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा दिली गेली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या स्मारकाविषयी वाद होऊ नये असे मला वाटते, असंही ते म्हणाले.

 

Wardha District Bank : जिल्हा बँकेसाठी धावून आली शिखर बँक!

स्मारकासाठी जागा दिली त्यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आताही सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्याविषयी महाराष्ट्रातील सर्व पक्षांना वेगळा सन्मान आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना बाळासाहेबांविषयी आदर आहे. पक्षीय राजकारणात बाळासाहेबांच्या स्मारकाला ओढले जाऊ नये, असं स्पष्ट मतही दरेकरांनी मांडलं.

Suspense on Guardian Minister : प्रफुल्ल पटेल ठरवतील गोंदियाचा पालकमंत्री!

मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्थेच्या बाजूनेच
देशमुख हत्येप्रकरणी मुख्यमंत्री वारंवार सांगत होते कुणालाही सोडणार नाही. तशा प्रकारची कारवाई होत होती. आणखी कठोर कारवाई होईल. जे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत होते त्यांना चपराक बसली आहे. गुन्हेगाराला जात नसते. कायद्यापुढे सर्व सारखे आहेत. कठोर कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असंही ते म्हणाले.