Sharad Pawar : शरद पवारांचा परफेक्ट ‘पंच’! शिलेदार मिळाले महत्त्वाचे पद

Sangram Gawande appointed Vice President of the State Boxing Association : संग्राम गावंडे यांना राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्षपद

Akola राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना राज्यस्तरीय महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली असून, खेळ क्षेत्रातील ही संघटनात्मक जबाबदारी आगामी काळात त्यांना राजकीयदृष्ट्याही लाभदायक ठरेल, असे मानले जात आहे.

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनमध्ये अकोल्यातील संग्राम गावंडे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच निवडणुकीत खामगावचे काँग्रेस नेते विठ्ठल लोखंडकार हे राज्य कार्याध्यक्षपदी तर अकोल्याचे विजय गोटे हे विभागीय सचिवपदी विजयी झाले आहेत.

Local Body Elections : बावनकुळेंच्या कामठीत अजित पवार गटाची नवी राजकीय चाल !

कवळी-दरेकर पॅनेलची सर्व २७ जागांवर बाजी

९ नोव्हेंबरला झालेल्या या निवडणुकीत कवळी-दरेकर पॅनेलने सर्व २७ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर हे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून विजयी झाले.

उपाध्यक्षपदी—पंकज भारसाकळे, मुन्ना कुरणे, मिलिंद साळुंखे, तुषार रंथे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, ॲड. गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, ॲड. शेख अकबर, वैभव बनकर, संतोष आंबेकर, विक्रांत खेडकर, नील पाटील, कॅप्टन शाहराज बिराजदार आणि विजय सोनवणे यांची निवड झाली.

Sudhir Mungantiwar : आपल्या पाठपुराव्यामुळे न्यायालय इमारतीला मंजुरी..आभारी आहोत, आ. सुधीरभाऊ!

सरचिटणीस—भरतकुमार व्हावळ
खजिनदार—अॅड. मनोज पिंगळे (बिनविरोध)
कार्यकारी सचिव—शैलेश ठाकूर
प्रशासकीय सचिव—महेश सकपाळ

अकोल्यातून आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्धपटू घडविण्याचा निर्धार

उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संग्राम गावंडे म्हणाले, “अकोल्यात बॉक्सिंगला पोषक वातावरण आहे. संयुक्त प्रयत्नांतून येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुष्टियुद्धपटू घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विदर्भात पुन्हा बॉक्सिंगच्या वैभवाचे दिवस परत आणण्यासाठी योग्य दिशा आणि सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ.”