व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sharad Pawar : वस्ताद पुन्हा मैदानात उतरणार? शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Sharad Pawar : वस्ताद पुन्हा मैदानात उतरणार? शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

sharad-pawar-discharged-from-ruby-hall-clinic-health-update-rajya-sabha-election-discussion : डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला, राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चांना वेग

Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. छातीत संसर्ग, खोकला आणि कफ यामुळे त्यांना बारामतीतील गोविंदबाग येथून तातडीने पुण्यात हलवण्यात आले होते.

रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या छातीत संसर्ग आढळून आला होता. त्यांच्यावर प्रतिजैविके देऊन उपचार करण्यात आले असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून पुढील काही दिवस पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉक्टरांच्या मते, दोन ते तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते प्रवास करू शकतील.

Sunetra Pawar : १५ दिवसांत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनेत्रा पवार

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. व्हीलचेअरवरून खाली येताना शरद पवार यांनी उपस्थितांना हात दाखवत अभिवादन केले. पुढील चार ते पाच दिवस त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर येताच राज्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे. एप्रिल महिन्यात सात राज्यसभा सदस्यांची मुदत संपत असून त्यामध्ये शरद पवार यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये याबाबत लवकरच चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

PMC Corporation : पुणे महापालिकेत सत्तेची सूत्रे पुन्हा जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती!

एकीकडे प्रकृतीत सुधारणा झाल्याने शरद पवार पुन्हा सक्रिय राजकारणात उतरण्याची चिन्हे दिसत असताना, दुसरीकडे राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रवादीतील संभाव्य घडामोडींमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__

error: Content is protected !!