Breaking

Sharad pawar : पहलगाम हल्ल्यात फक्त पुरुषच टार्गेट, महिलांना धक्काही नाही !

 

Sharad Pawar said I went to Pahalgam two-three months ago : देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे

Sindhudurg : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला हा इंटेलिजन्स फेल्युअर आहे. तेथील इतर स्थानांपेक्षा पहलगाम हे सुरक्षीत आहे. आपले लोक तेथे जात असतात. पण दहशतवाद्यांनी त्यांचे उद्दीष्ट्य साध्य केले, असा निष्कर्ष काढला जात आहे, तो सावधान करणारा आहे. आता सरकारने अधिक काळजी घेतली पाहिजे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

सिंधुदुर्ग येथे काल (२५ एप्रिल) शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पर्यटकांना हिंदू आहे की मुस्लीम असे विचारून गोळ्या झाडल्या, असे सांगितले जाते. पण यामध्ये किती सत्य आहे, हे मला माहिती नाही. मी एका बहीणीच्या घरी गेलो होतो. तिच्याशी बोलल्यानंतर जाणवलं की, तेथे जे लोक होते, त्यातून महिलांना सोडल्याचं दिसतंय. त्या बहीणीने सांगितलं की, आम्हाला हातही लावला नाही. त्यांनी पुरूषांवरच हल्ला केला. यामागचे कारणही शोधून काढण्याची गरज आहे.

Sharad Pawar : AI तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती होणार

कमतरता आहे..
आम्ही दहशतवाद मोडून काढला, असं केंद्र सरकार सातत्याने सांगत होतं. पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे मात्र खरं. आम्ही केंद्र सरकारच्या सोबत आहोत. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्या बैठकीला आमच्या पक्षाच्यावतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. हा हल्ला सरकारने अधिक गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण सरकार कुठे तरी कमी पडतंय, हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने नष्ट केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू!

राजकारण करायचं नाही..
काश्मीरमध्ये जे घडलं, त्यानंतर जी स्थिती आहे, त्यामध्ये देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत उभे राहिले पाहिजे. येथे राजकारण आणू नये. दहशतवाद्यांनी जे कृत्य केलं, ते भारताच्या विरोधात आहे. अशा वेळी राजकारण करायचं नसतं. आम्हीही करत नाहीये. आम्ही सरकारच्या सोबत आहोत. काश्मीरच्या लोकांचा चरीतार्थ पर्यटनावर आहे. पुढील काळात लोक काश्मीरला जाणार नाहीत, असं आजच्या परिस्थितीवरून दिसतंय. परिणामी काश्मीरच्या जनतेचं मोठं नुकसान होणार आहे. पण घटनेनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि देशाच्या बाजूने उभे राहिले, ही एक बाजू चांगली आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.