This name is in news for the responsibility of Nationalist Youth : राष्ट्रवादी युवकच्या जबाबदारीसाठी हे नाव चर्चेत
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात भाकरी फिरवली जाणार असून, राज्याच्या राजकारणात एकेकाळी प्रभावी ठसा उमटवणारे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या मुलाला, रोहित पाटील यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या मेहबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मतदारसंघांचा सखोल अभ्यास असलेले आणि आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखले जाणारे मेहबूब शेख हे शरद पवार यांच्या विश्वासातील नेते मानले जातात. तथापि, आता तुलनेने संयत परंतु तळागाळाशी थेट नाळ असलेल्या रोहित पाटील यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाचा कल झुकलेला दिसत आहे. लवकरच होणाऱ्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mahayuti Politics : शिंदेंच्या योजनांना का लावला जातोय चाप ?
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अवघे 10 आमदार निवडून आले. यामध्ये तासगाव-कवठेमहंकाळ मतदारसंघातून 1,26,478 मतांनी विजयी झालेले रोहित पाटील हे विशेष चर्चेत आले होते. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते संजयकाका पाटील यांचा पराभव करून लक्ष वेधले होते. फक्त 25 व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील हे देशातील सर्वात तरुण आमदार ठरले होते. कायद्याचे पदवीधर असलेले पाटील हे आपल्या वडिलांप्रमाणेच लोकांशी थेट संवाद साधण्याची आणि तळागाळात मिसळण्याची हातोटी असलेले नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत ते आश्वासक तरुण नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत.
Local Body Elections : खामगावात महायुतीत ताटातूट?, निवडणुकीपूर्वी टेंशन वाढले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून देखील संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत. राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तामामा भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून, या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.