व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा...

Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली

sharad-pawar-health-update-admitted-again-to-ruby-hall-clinic-pune : अशक्तपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा निर्णय

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते; मात्र अशक्तपणा वाढल्याने त्यांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अशक्तपणा जाणवत असून सलाईनद्वारे उपचार केले जाणार आहेत.

यापूर्वी छातीत कंजेशन आणि खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात हलविण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी विश्रांतीसाठी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने वैद्यकीय तपासणीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे. आवश्यक तपासण्या करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येणार असून काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाईल.

राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील अधिकृत आरोग्यविषयक निवेदन जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
____

error: Content is protected !!