BJP’s strategy is to sideline its ally parties : महायुतीत कुरघोडीचे राजकारण, शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
Akola सत्तेसाठी गरजेपुरतेच भाजपकडून मित्रपक्षांचा वापर केला जातो आणि समीकरण बदलताच त्यांना बाजूला करण्याची रणनीती राबवली जाते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काही पक्षांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून “सर्वकाही आम्हीच हाताळतो” असे चित्र भाजपने निर्माण केले. त्यामुळे महायुतीत कुरघोडी सुरू असून, २०२९ च्या निवडणुकीत भाजप स्वबळाचा नारा देत असल्याने ते कोणाला बरोबर घेतील, कोणाला सोडतील हे सांगता येत नाही. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याची टीकाही त्यांनी केली.
NCP Sharad Pawar : रस्त्यावर उतरा, लोकांपर्यंत जा, त्यांना न्याय मिळवून द्या
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, प्रा. विश्वनाथ कांबळे, शहराध्यक्ष मो. रफीक सिद्दीकी, दिलीप आसरे उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढवल्या जातील, असे शिंदे यांनी सांगितले. जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसून याबाबत घटक पक्षांच्या बैठकीत ठरवले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
India Alliance : संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा २०२४ रद्द करा
राज्यातील शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नांवर १५ सप्टेंबर रोजी नाशिक येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा होईल. तसेच अकोल्यातील स्थानिक प्रश्नांसंदर्भात लवकरच मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.








