Shefali Jariwala passes awaybFamous for Bigg Boss, Nach Baliye :;म्युझिक अल्बम, बिग बॉस, नच बलिये मध्ये होती प्रसिद्ध
Mumbai : ‘ बिग बॉस’ ‘नच बलिये’ तसेच म्युझिक अल्बम मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला, हिचे निधन झाले आहे. ‘ काटा लगा’ गाण्यामुळे ती अधिक प्रसिद्ध झाली होती, तिच्या अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रांमध्ये खळबळ माजले आहे, हृदयविकाऱ्याच्या झटक्याने तिचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान तिची काही महिन्यापूर्वीची एक्स फ्रेंड ला केलेली पोस्ट या निमित्ताने चर्चेत आली आहे.
‘ काटा लगा’ गर्ल आणि बिग बॉस 13 मधील स्पर्धक शेफाली जरीवाला हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ती 42 वर्षाची होती. शेफालीची प्रकृती बिघडल्यानंतर तिचे पती पराग यांनी तिला कूपर रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरात मधील अहमदाबाद मध्ये झाला. ती अनेक रियालिटी शो, म्युझिक अल्बम मध्ये दिसून आली होती. नच बलिये 5 आणि नच बलिये 7
मध्येही ती सहभागी झाली होती. 2019 मध्ये बिग बॉस 13 मध्ये शेफाली दिसली. शेफालीचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न 2004 मध्ये संगीतकार हर्मित सिंग यांच्याशी झाले. परंतु 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये शेफालीने अभिनेता अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.
Bacchu Kadu : एकल महिलांचा हक्कासाठी एल्गार; १४ जुलैला विदर्भस्तरीय मंथन
याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेफालीने दोन सप्टेंबर 2024 रोजी एका पोस्टमध्ये सिद्धार्थ शुक्ला याच्याबद्दल लिहिले होते. ‘ मित्रा आज मी, तुझा विचार करतेय’ अशी ही पोस्ट आहे. अनेक वर्षांपूर्वी शेफाली दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला डेट करत होती शो दरम्यान तिचे हे आधीचे नाते उघड झाले होते. शेफालीने एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ सोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. आमच्या आवडी निवडी सारख्या आहेत. आणि खूप गोष्टीबद्दल बोलायचो, आम्ही डेटिंग थांबवले तरीही जेव्हा एकमेकांना भेटायचं तेव्हा नेहमीच चांगल्या पद्धतीने वागायचो असे ती सिद्धार्थ बाबत सांगायची.
_____