Shegao-political-clash-shindesena-vs-bjp : आरोग्य मेळावा आटोपला, आता अधिवेशन, धार्मिक व्यासपीठावरून राजकीय संदेश
Shegao विदर्भातील आध्यात्मिक ओळख असलेले शेगाव सध्या राजकीय हालचालींचे नवे केंद्र ठरत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मागील काही दिवसांत येथे घडलेल्या सलग कार्यक्रमांमुळे शेगाव केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ बनत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
अलीकडेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून शिंदेसेनेने आपली संघटनात्मक ताकद, तसेच केंद्र आणि राज्य पातळीवरील समन्वय अधोरेखित केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात आणि उपस्थितीतून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना नवा आयाम मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.
Sunil tatkare controversy : अजित पवार हयात असताना दिलेले सेल अध्यक्षांचे राजीनामे मंजूर !
याच पार्श्वभूमीवर आता शेगावात विश्वमांगल्य सभेच्या वतीने दोन दिवसीय निवासी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या अधिवेशनाच्या नियोजनात भाजपचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे अधिवेशन केवळ सामाजिक किंवा वैचारिक कार्यक्रम न राहता, त्यातून ठोस राजकीय संदेश दिला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिवेशनाच्या तयारीसाठी नुकतीच अपर्णा संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपकडून शेगाववर विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
ZP elections : मेहकरात उद्धवसेनेची आक्रमक चाल; निवडणुकीपूर्वीच जोरदार तयारी
एकीकडे शिंदेसेनेचा राष्ट्रीय आरोग्य मेळावा, तर दुसरीकडे भाजप-संलग्न अधिवेशन—या दोन समांतर घडामोडींमुळे शेगावात राजकीय शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी स्थानिक व जिल्हास्तरीय राजकारणाच्या दृष्टीने या हालचाली निर्णायक ठरतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








