Shegao Politics : पोस्टरवरून ‘तणाव’! शेगावच्या मेळाव्यात भाजपचे दोन्ही नेते धीरगंभीर का?

Poster-features-photos-of-two-former-Shinde-Sena-MLAs-alongside-the-sitting-MLA : पोस्टरमध्ये विद्यमान आमदारांसोबत शिंदेसेनेच्या दोन माजी आमदारांची छायाचित्रे

Shegao येथे होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या पोस्टरने जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. पोस्टरमध्ये विद्यमान आमदारांसोबत शिंदेसेनेच्या दोन माजी आमदारांची छायाचित्रे झळकल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक घेतली. या बैठकीस भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे आणि जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे उपस्थित होते. मात्र, बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांचे चेहरे गंभीर दिसल्याची चर्चा रंगली आहे.

Air ambulance crash : दिल्लीकडे जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात

राजकीय सूत्रांच्या मते, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सुरू असलेले मतभेद यामागे कारणीभूत असू शकतात. तर दुसरीकडे, पोस्टरमध्ये शिंदेसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांची छायाचित्रे झळकल्याने नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांमुळे चंद्रपूरकरांना मोठा दिलासा ; पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २००४ घरांसाठी २३० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राची हिरवी झेंडी

विशेष म्हणजे, भाजपच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची छायाचित्रे पोस्टरवर नसल्याने या चर्चेला अधिकच खतपाणी मिळाले आहे. अधिकृतरीत्या कोणीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी “पोस्टर पॉलिटिक्स”मुळे स्थानिक आघाड्यांमध्ये अदृश्य तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर या मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलणार का, की हा केवळ योगायोग, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.