Shetkari Sanghatna : “राज्याचे विधिमंडळ हे निधीमंडळ झाले आहे” – ललित बहाळे यांचा सरकारवर हल्लाबोल

Allegations that every MLA is struggling only to get funds : प्रत्येक आमदार केवळ निधी मिळवण्यासाठी धडपडतोय, पत्रकार परिषदेत आरोप

Buldhana “जे धोरणाने बदलू शकते ते अर्थसंकल्पीय मदतीने बदलत नाही. त्यामुळे केवळ आर्थिक मदतीच्या घोषणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत,” असे सांगत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “आजचे राज्य विधिमंडळ हे ‘विधीमंडळ’ न राहता केवळ ‘निधीमंडळ’ बनले आहे, कारण प्रत्येक आमदार केवळ निधी मिळवण्यासाठी धडपडतोय,” असा आरोप त्यांनी केला.

स्थानिक पत्रकार भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील, ललित ढोसे, एकनाथ पाटील, ज्ञानेश्वर खरात आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बहाळे म्हणाले, “शेती क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यास शेतकरी आत्महत्या रोखता येऊ शकतात. मात्र, सरकारने जेनेटिक इंजिनीअरिंगवर बंदी घातली आहे. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादनवाढीसह आत्महत्या कमी होतील.”

 

Dhad Grampanchayat : धाड ग्रामपंचायतीत निधी गैरव्यवहाराचा आरोप; ३.५ कोटींच्या खर्चाचा हिशेब गायब

“शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते; शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या. जर सरकारने योग्य धोरणे आखली तर शेतकरी स्वतःचे कर्ज फेडू शकतो. पण कोणत्याही पक्षाचे सरकार असो, शेतकरीविरोधीच धोरणे राबविली जात आहेत,” अशी खरमरीत टीका बहाळे यांनी केली.

Khotkar Vs Gorantyal : भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले?

सोयाबीन बाजार सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, बहाळे यांनी जाहीर केले की, सप्टेंबर महिन्यात सेबीच्या कार्यालयावर शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.