Breaking

Shikshak Bank Recruitment Scam : सात जणांवर ठपका, १५०० पानी दोषारोपपत्र दाखल

Seven people charged, 1500-page chargesheet filed : न्यायालयाच्या दणक्यानंतर एफआयआर; पुरवणी दोषारोपत्राची शक्यता

Amravati विदर्भातील सहकार क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील The Amravati Zilla Parishad Shikshak Sahkari Bank नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १ ऑगस्ट रोजी प्रथम श्रेणी न्यायालयात १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात बँकेचे अध्यक्ष, चार संचालक, तसेच सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा एकूण सात जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.

२०२४ मध्ये एप्रिल-मे महिन्यांत शिक्षक बँकेद्वारे ४३ पदांसाठी नोकरभरती करण्यात आली होती. या भरतीमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत एका अपात्र उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर १३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री राजापेठ पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांच्यासह अन्य संचालक आणि भरती प्रक्रियेस जबाबदार असलेल्या सोलापूर संस्थेतील तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला होता.

Pranjal Khewalkar’s : प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमधून उघड झाला ‘ नंगानाच ’ !

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणात पुरवणी दोषारोपत्र दाखल करण्याचीही शक्यता आहे, असेही अवचार यांनी स्पष्ट केले.

दाखल दोषारोपत्रानुसार, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत, संचालक राजेश विश्रामजी गाडे, अजयानंद सच्चितनंद पवार, राजेश प्रभाकर देशमुख, रामदास शेषराव कडू, तसेच सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अशोक लुनावत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Dharmapal Meshram : आदिवासी फासेपारधींच्या वस्त्यांमध्ये दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्या !

ही नोकरभरती सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनमार्फत संनियंत्रित करण्यात आली होती. भरती प्रक्रियेमध्ये संगनमत करून नोकऱ्या विकल्या गेल्याचा आरोप तक्रारदार निकेश बोंडे यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत सचिन नांदणे, सविता बोरवाल यांच्यासह इतर उमेदवारांची फसवणूक झाल्याचा दावा केला आहे.