Breaking

Shinde VS Thackeray : प्रतिष्ठेच्या महापालिका निवडणूक तयारीत उद्धव सेनेतील शिलेदाराची गळती थांबेना!

After the meeting at Matoshree, 2 former corporators join Shinde’s Shiv Sena : मातोश्री वरील बैठक आटोपून 2 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत

Mumbai : शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळेच तयारीला लागले आहेत. यात ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबायचे नाव घेताना दिसत नाही मातोश्री वरील बैठकिला उपस्थित असलेले
2 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याने मोठी चर्चा होत आहे.

माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखाप्रमुख संजय जंगम काल झालेल्या मातोश्री वरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र आज त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला,
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वेगात वाहू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाकरे गटाला राज्यभरात मोठी गळती लागल्याचं चित्र दिसून येत आहे. मुंबईत पुन्हा ठाकरेंच्या आणखी दोन शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे, ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही मातोश्री वरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे.

Raj & Uddhav Thackeray : संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू

 

शिवसेना ठाकरे गटाच्या दोन नेते आज ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.दरम्यान, आज वर्धापन दिनाच्या दिवशीच शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्याचे बोलले जातेय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणारे विधानसभा संघटक यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण सांगताना म्हटलं की गेले अडीच ते तीन वर्ष महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्ही शिवसेना ठाकरे गट या पक्षाचा झेंडा घेऊन विधानसभेला संघटक आणि नगरसेवक म्हणून कार्य प्रामाणिकपणे पार पाडलं.

काम करत असताना मधल्या काळात काही संघटनात्मक बदल झाले. ते बदल झाल्यानंतर संघटनेच्या वाईट काळामध्ये आम्ही एकनिष्ठपणे सोबत राहिलो. मात्र, नवीन नेमणूक झाल्यानंतर त्यांनी आमच्या सर्वांचं दमन करायचा प्रयत्न केल्यानंतर ते आमच्या खूप मनाला लागलं. ज्यावेळी गरज होती त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरून झेंडे घेऊन भांडण करत होतो. पक्षासाठी आम्ही नेटाने उभे राहत होतो.

Shivendrasinghraje Bhosale : राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारे रस्ते बनवणार !

 

पक्षाचं काम करत होतो. विधानसभेला आम्ही सगळ्यांना एकत्रपणे सोबत घेऊन काम केलं. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघ सर्व निवडणुका पार पाडल्या. मात्र, नवीन नेमणूकानंतर आमचं दमन करण्याचा प्रयत्न केला, असंही पुढे नाराज नगरसेवकांनी म्हटले आहे. विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

___