Breaking

Shindes Delhi visit : अमित शाहांसमोर महायुतीतील विसंवादाची चर्चा !

Shindes aggressive tone during Delhi visit Issue of obstacles on the agenda : दिल्ली भेटीत शिंदेंचा आक्रमक सूर; अडथळ्यांचा मुद्दा ऐरणीवर

New Delhi : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचा सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौरा चर्चेत आला आहे. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटींना केवळ सदिच्छा भेटी म्हणून न पाहता, महायुतीतील वाढती अस्वस्थता आणि अंतर्गत विसंवादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात सुमारे 25 मिनिटे एकांतात चर्चा झाली. या चर्चे दरम्यान शिंदेंनी महायुतीतील अडचणी, गोंधळलेली समन्वय यंत्रणा, जिल्हास्तरीय मतभेद, व कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेला संभ्रम या बाबतीत आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणनीती, जागावाटपातील अनिश्चितता आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

Meeting of MPs : संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम, आक्रमक भूमिका घ्या !

याच भेटीत शिंदेंनी महादेवी हत्तीणीच्या सुटकेसंदर्भातील कामगिरी, जनभावना आणि त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल चर्चा केली. महादेवीला परत आणण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे समजते.

अमित शाह यांच्याशी एकांतातील चर्चेनंतर शिंदेंनी शिवसेना शिंदे गटाचे काही खासदार सोबत घेऊन सामूहिकरित्या देखील चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीला शिंदेंच्या पत्नी, मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे आणि सुनबाई उपस्थित होते. या भेटीत त्यांनी पंतप्रधान मोदींना भगवान शंकराची प्रतिमा भेट दिली. “ऑपरेशन महादेव” या कारवाईच्या यशाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.

Local body Election : मतदार यादीत अनियमितता, ईव्हीएमबाबत शंका !

या भेटींमुळे महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील ताणतणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीतील अनुभव, जागावाटपातील मतभेद, कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी यावरून सत्ताधारी गटांमध्ये अंतर्गत घडामोडी अधिकच तीव्र झाल्या असल्याचे दिसते. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याने त्या घडामोडींना अधिक गती दिली आहे.