Shocking incident Shirdi area, anger over type of robbery : शिर्डी परिसरात धक्कादायक घटना, लुटमारीच्या प्रकारामुळे संताप
Shirdi : पार्टी करायला लागणाऱ्या पैशासाठी, सात अल्पवयीन मुलांनी एकाचे अपहरण करून त्याला मारून लुटले आणि त्या व्यक्तीचा मृतदेह उसात फेकून, त्याच्या मोबाईल साडेचार हजार रुपयांना विकला आणि त्याच पैशातून आरोपींनी पार्टी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिर्डी आणि परिसरात सातत्याने होत असलेल्या लुटमारीच्या या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. अशा गुन्ह्यात अल्पवयीनांचा सहभाग हा अधिक धोकादायक मानण्यात येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी सात अल्पवयीन मुलांनी मिळून एका 42 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सखाहरी चत्तर हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर नांदुर्खी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला.
Iran Israel War: विमान प्रवास, पेट्रोलच्या किंमती सह महागाई वाढणार, कामगारांवरही मोठे संकट
चौकशीत समोर आले की, मृताचा मोबाईल एका अल्पवयीन मुलाने साडेचार हजार रुपयांना विकला होता आणि त्याच पैशातून आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती. पार्टीसाठी मुलांनी पायी निघालेल्या गणेश चत्तर यांचे अपहरण केले. नशेत असलेल्या मुलांनी आधी त्यांना मारहाण केली, नंतर गळा दाबून आणि धारदार चाकूने हल्ला करून हत्या केली. त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. पोलिसांनी सातही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना खळबळजनक असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी शिर्डीत झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करून लूट केल्याचा आणि एका तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि नंतर त्याचा खून करण्यात आल्याची ही घटना शिर्डीमध्ये घडली. या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे..
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील 42 वर्षीय गणेश चत्तर हे बेपत्ता होते. दरम्यान शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा केला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.
गणेश चत्तर हे रस्त्याने पायी जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना उसाच्या कांडक्याने तसेच हाताने मारहाण करून त्यातील एकाने त्यांचा गळा दाबला. त्याच वेळी दोन जणांनी चाकूने हल्ला करत त्यांचा खून केला. मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाइल काढून घेतला. हा मोबाइल नंतर विकला. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या सापडल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.