Actor Prasad Oak’s photo as Anand Dighe on Eknath Shinde’s Shiv Sena banner : एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाचा अजब घोळ
Amravati : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे म्हणून शिवसेनेच्या अमरावती जिल्हाप्रमुखाने बॅनरवर धर्मवीर चित्रपटातील अभिनेते प्रसाद ओक यांचा फोटो वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेने नुकतीच अमरावती जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये जिल्हाप्रमुखपदी ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांची निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवर आनंद दिघे यांच्या जागी अभिनेता प्रसाद ओक यांचा फोटो लावण्यात आला. विशेष म्हणजे स्वतः ठाकूर प्रमोदसिंह यांनी गुढीपाडवा आणि स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छांसाठी तयार केलेल्या बॅनरवरही आनंद दिघे यांच्या नावाखाली प्रसाद ओक यांचा फोटो छापण्यात आला आहे.
Akash Fundkar : सातकलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा!
धर्मवीर चित्रपटात प्रसाद ओकने साकारली होती आनंद दिघेंची भूमिका..
प्रसाद ओक यांनी “धर्मवीर” चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची वाढ आणि बळकटी यामध्ये आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे ते जनसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाले होते. त्यांच्या जीवनावर आधारित “धर्मवीर” चित्रपटात प्रसाद ओक यांनी त्यांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्यांचा लूक आणि देहबोली आनंद दिघे यांच्याशी मिळतीजुळती असल्यामुळे ही भूमिका विशेष गाजली होती.
Maharashtra Medical Council : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची आज निवडणूक
शिवसेनेच्या फूटीनंतर शिंदे गटाच्या प्रत्येक बॅनरवर आनंद दिघे यांचा फोटो लावला जातो. मात्र, काही पदाधिकाऱ्यांकडून या बाबतीत चुका केल्या जात आहेत. जिल्हाप्रमुखासारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीकडून अशी चूक घडल्यामुळे याची चर्चा अजूनच रंगली आहे.