Breaking

Shiv Sena Eknath Shinde : स्थानिक निवडणुका गायकवाड यांच्या नेतृत्वात?

Eknath Shinde entrusted the responsibility of district organizer to MLA Gaikwad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी

Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात संघटनात्मक बदल होत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पक्षात अनेक नवे बदल केले. यात आता आणखी एक भर पडली आहे. त्यांनी बुलढाण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुका त्यांच्या नेतृत्वात होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वसेनेने बुलढाणा जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय गायकवाड कायम वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहात असले तरीही शिवसेनेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. यापूर्वी देण्यात आलेले जिल्हा संपर्क प्रमुख पद रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी जिल्हा संघटक असे पद त्यांना देण्यात आले आहे.

Maharashtra BJP : ‘कमळ’ सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका!

गेल्या सात वर्षांमध्ये आमदार गायकवाड जेवढे विविध वादांमुळे चर्चेत राहिले, तेवढाच पक्ष मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला. शिवसेनेची घडी मजबूत करत ग्रामीण आणि शहरी भागात पक्षाचा प्रभाव वाढवला असल्याचे बोलले जात आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी निवडणुकांमध्ये शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात यासाठी गायकवाड यांच्याकडे सर्व अंगिकृत संघटनांचे समन्वय आणि प्रचाराचे नेतृत्व देण्यात आले आहे.

MSIDC : विधानभवन विस्ताराच्या कामातून पीडब्ल्यूडी आऊट!

या निवडीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाच्या यशासाठी ही जबाबदारी निर्णायक ठरणार आहे. गायकवाड यांच्या निवडीनंतर अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थक मित्रपरिवाराने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.