Shivaji Education Society : कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू होणार

An Agricultural College to Be Established at Papal : शासनाचा अध्यादेश जारी; श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मागणीला यश

Amravati कृषिमहर्षी डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख Dr. Punjabrao Deshmukh यांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अखेर शासनाने मान्यता दिली आहे. राज्य शासनाने अध्यादेश काढत या निर्णयाची औपचारिक घोषणा केली. त्यामुळे पापळ ग्रामस्थांसाठी ही दिवाळीची मोठी भेट ठरली आहे. तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थेला पापळ (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्यास विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. शिक्षणमहर्षींच्या जन्मगावी कृषी महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता.

Vijay Wadettiwar : सरकारने केली मंत्र्यांच्या मलिदा खाण्याची सोय !

शासननिर्णयानुसार हे कृषी महाविद्यालय सत्र २०२५-२६ पासून सुरू होणार असून, प्रारंभी ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेवर कायमस्वरूपी आणि विनाअनुदान तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयाला शासनाने ठरविलेल्या काही अटी-शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. गतवर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता प्रत्यक्षात उतरले आहे.