Shivaji Maharaj Jayanti : ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेने दुमदुमली वर्धा नगरी

‘Jai Shivaji Jai Bharat’ Padayatra in Wardha : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी – पालकमंत्री

Wardha रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. सर्कस मैदान रामनगर येथे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर Dr. Pankaj Bhoyar यांनी पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवली. आकर्षक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर, ‘जय शिवाजी, जय भवानी’चा जयघोष व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वर्धा नगरी दुमदुमली.

आदर्श भारत घडविण्यासाठी आजच्या युवा पिढीने शिवरायांची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य देशासाठीच नव्हेच तर जगासाठी आदर्श आहे. शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरूण पिढीमध्ये रुजविण्यासाठी जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. शिवरायांचे कार्य देशातच नव्हे तर जगाने स्विकारले आहे, असे मनोगत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.

Vijay Wadettiwar : महाराजांचा चुकीचा इतिहास लिहीणारे आरएसएसचे फॉलोअर !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा प्रशासनाव्दारे आयोजित पदयात्रेचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी रेवैया डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा घडविण्यामध्ये माँ जिजाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. महिला स्वत:पुरत्या मर्यादीत न राहता वैभवशाली व्यक्तीमत्व घडवित असतात. महिलांनी माँ जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आपल्या पाल्यांना चांगले संस्कार द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच कमी कालावधीत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेच्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल प्रशासानाचे कौतुक केले.

Wardha Police : तो म्हणाला, मी चमत्कार करतो… त्यांनी ११२ नंबर डायल केला!

माजी खासदार रामदास तडस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. महाराजांनी समाजवादी, निरपेक्ष समाज निर्माण केला. शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. युवावर्गाने महाराजांचा आदर्श घेऊन चांगले कार्य करावे, असे ते म्हणाले. यावेळी युथ आयकॉन यांनीही मनोगत व्यक्त केले.