An exhibition of Shivaji Maharaj period weapons will be held in the central museum : माजी मंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचा होतोय उल्लेख; अपर मुख्य सचिवांनी घेतला आढावा
Nagpur छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे नागपुरात लवकरच आगमन होणार आहे. यादृष्टीने अपर मुख्य सचिवांनी मध्यवर्ती संग्रहालयातील तयारीचा आढावा घेतला. यानिमित्ताने पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या प्रयत्नांचा उल्लेख होत आहे. वाघनखांना भारतात आणण्याचे श्रेय शिवभक्तांकडून सुधीर मुनगंटीवार यांना दिले जात आहे. लंडनच्या संग्रहालयातून आलेली वाघनखे ७ फेब्रुवारीपासून नागपुरातील शिवभक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
नागपूर येथे येत्या 7 फेब्रुवारी पासून शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते उद्घाटन होईल. झिरो माईलपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी स्वतंत्र हॉल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी एकाच वेळी सूमारे 50 लोकांना प्रदर्शनाची पाहणी करता येईल. त्यानुसार गटाने प्रवेश व्यवस्था असेल. वाघनखे व शिवशस्त्रासह खुले शिल्पदालन, शिलालेख दालन पाहता येईल. खुलेशिल्प दालनामध्ये मध्य भारतातील आढळून आलेली इसवीसन पूर्व ते मध्ययुगीन काळापर्यंतची विविध मुर्तीशिल्पे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
Sudhir Mungaitiwar : निवडणुका जिंकण्यापेक्षा मने जिंकण्यावर भर !
शिवकालीन शस्त्र दालनामध्ये वाघनखे, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा, अग्नीबाण आदी महत्वपूर्ण शस्त्रास्त्र पाहता येतील. अग्नीबाण हा राज्याच्या केवळ नागपूर येथील संग्रहालयात उपलब्ध आहे. या ठिकाणी विविध मर्दानी खेळ व शिवकालीन शस्त्रांची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्य समारंभ रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात होईल.
Child labor law : बालकामगार कायदा केवळ कागदावरच; उपाययोजना अपयशी !
ब्रिटीशांच्या ताब्यात असलेली वाघनखे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. यासमवेत शिवशस्त्र नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बघावे, असा प्रयत्न करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केल्या. मध्यवर्ती संग्रहालयात खास उभारण्यात आलेल्या सभागृहातील तयारीचा त्यांनी आढावा घेतला.