Shivdeep Lande soon on the political scene : शिवदीप लांडे लवकरच राजकीय पटलावर
Akola जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील रहिवासी आणि बिहार कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारलाच कर्मभूमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनाम्यानंतर ते अकोल्यात परतले नाहीत, तर बिहारमध्येच थांबून भविष्यातील योजनांवर काम करत आहेत. कुण्या घरांना जळकी भरवणारा हा अकोलाचा सुपुत्र आता राजकीय भर द्यावा कुणाला दळके भरून याबाबत उत्सुकता लागली आहे.
“सिंघम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवदीप लांडे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू असून, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत ते सक्रिय होऊ शकतात. त्यांनी सोशल मीडियावर “एक पाऊल मातीच्या ऋणाकडे” अशी पोस्ट लिहिली असून, ती वेगाने व्हायरल होत आहे.
Manikrao Kokate : आता कृषीमंत्री म्हणतात, ‘शेती कणा, शेतकरी केंद्रबिंदू’
फेसबुकवर “One Step Towards the Debt of Soil” या कॅप्शनसह त्यांनी बिहारच्या नकाशासोबत सूर्याला नमस्कार करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर, “कर्मयो… खाकी से खाक होने तक…” अशी आणखी एक पोस्ट त्यांनी टाकली आहे, ज्यामध्ये त्यांचा वर्दीतील आणि साध्या वेषातील फोटो आहे.
शिवदीप लांडे यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा ते पूर्णिया येथे आयजी पदावर कार्यरत होते. ६ सप्टेंबर रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र १३ जानेवारी २०२५ रोजी त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यामुळे ते राजकीय क्षेत्रात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Nagpur police : ‘रिल्स बघू नको’ म्हटल्यामुळे मुलगा घर सोडून गेला !
शिवदीप लांडे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पारस येथे पूर्ण केले. त्यानंतर शेगाव येथील महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. बिहारमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी दबंग अधिकारी म्हणून लौकिक मिळवला. सध्या शिवदीप लांडे यांच्या पुढील भूमिकेवर राज्यभरात चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये राजकीय इनिंग सुरू करण्यासंबंधी त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या पोस्टमधून ते राजकारणाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.