Tension in Wani, angry slogans against the government and police : वणीमध्ये तणाव, सरकार व पोलिसांविरोधात संतप्त घोषणा
Wani : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून वणी येथे गनिमी काव्याने आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढत जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या अटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला असून, पोलिस आणि सरकारविरोधात वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. अशोक उईके हे वणी येथे आढावा बैठकीसाठी दाखल झाले होते. त्यावेळी विश्रामगृहावरून बैठकस्थळी जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनासमोर काळे झेंडे दाखवत रास्ता रोको केला होता. जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “ओला दुष्काळ जाहीर करा!”, “सरसकट कर्जमाफी द्या!” अशा घोषणा देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Relief to Maratha : मराठ्यांना दिलासा आरक्षणाबाबतच्या जीआरला स्थगितीस नकार !
या आंदोलनात पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. कारण शिवसैनिकांनी गनिमी काव्याचा वापर करून अचानकच पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर लोटांगण घातले. काही क्षण पोलिसांनाही काही सुचले नाही, मात्र लगेचच पोलिसांनी कारवाई करत जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख विनोद ढुमणे, शहरप्रमुख सुधीर थेरे, महिला नेत्या गीता उपरे यांच्यासह इतरांना ताब्यात घेतले.
Judiciary : देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असे वातावरण नाही
या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आमदार संजय देरकर हे घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, खासदार संजय देशमुख हेही आंदोलनकर्त्यांना भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरीही सरकारकडून मदतीचा ठोस निर्णय न झाल्याने शिवसेनेने हे आंदोलन उभारले. शिवसैनिकांनी गनिमी काव्याच्या पद्धतीने केलेले हे आंदोलन प्रशासनाला चांगलेच धडा शिकवणारे ठरले असल्याची चर्चा स्थानिकांत सुरू आहे.
_____








