After twenty years, an ST bus arrived in Harnkhed : हरणखेडमध्ये ग्रामस्थांचा जल्लोष, शिवसेनेने दिला होता इशारा
Malkapur तब्बल वीस वर्षे गावकऱ्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हरणखेडमध्ये एसटी बस दाखल झाली. शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी महामंडळाने तत्काळ निर्णय घेतला आणि लालपरी गावात दाखल झाली. ग्रामस्थांनी डफडे वाजवून व फटाके फोडून बसचे जल्लोषात स्वागत केले.
हरणखेडमधील रस्त्याअभावी गेली दोन दशके बससेवा थांबली होती. त्यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्ध व नागरिकांना एक किलोमीटर पायी चालत जाऊनच एसटीने प्रवास करावा लागत होता. ग्रामपंचायत प्रशासन, शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दोन महिन्यांत रस्त्याची दुरुस्ती, झाडाझुडपे तोडणे व महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांची उंची वाढवणे अशी कामे करून मार्ग मोकळा केला. यानंतर आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर यांनी गावकऱ्यांची मागणी मान्य केली.
MLA Manoj Kayande : यात्रा महोत्सवात प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
या बसप्रवेशावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरीदास गणबास, किसानसेना तालुकाप्रमुख महादेव पवार, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आगार व्यवस्थापक मुकुंद नाव्हकर, वरिष्ठ लिपिक प्रमोद अहेर, बसचालक आर.पी. कोळी व वाहक के.बी. शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Banjara Reservation : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाजाचा नारा
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होताना ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गावातील पोलीस पाटील पूंजाजी वसतकार, उपसभापती नागो राणे, ग्रामपंचायत सदस्य राजू नेवे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.