Shiv Sena announces name, but former corporators are unaware : शिंदेंसेनेने जाहीर केलेल्या यादीवर पाच माजी नगरसेवकांचा सवाल
Nagpur उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सध्या नागपुरात चांगलाच ताल धरला आहे. तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याचा माहोल करण्यात आला. त्यानंतर काहींना प्रवेशही देण्यात आला. पुढे यादी जाहीर करण्यात आली. पण पाच माजी नगरसेवकांना आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे यादीतूनच कळले. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. आम्ही प्रवेश मागितलाच नाही, मग यादीत नाव कसे आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल Ashish Jaiswal यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश घेतल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. पण प्रत्यक्षात असे काही झालेच नाही. शिंदेसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप या माजी नगरसेवकांनी केला आहे. आता हा प्रकार थेट एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपच्या दुर्गा रेहपाडे यांच्यासह उद्धवसेनेचे परसराम बोकडे, जिजाबाई धकाते, भास्कर बुरडे व भीमराव नंदनवार या पाच माजी नगरसेवकांनी आपण शिंदेसेनेत प्रवेशच घेतला नाही असे स्पष्ट केले आहे. रविभवन येथे जयस्वाल यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह काही माजी नगरसेवक व विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांना शिंदेसेनेत प्रवेश देण्यात आला.
यानंतर शिंदेसेनेकडून प्रवेश घेणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपच्या दुर्गा रेहपाडे यांच्यासह उद्धवसेनेचे परसराम बोकडे, जिजाबाई धकाते, भास्कर बुरडे व भीमराव नंदनवार या पाच माजी नगरसेवकांचीही नावे होती. मात्र, या पाचही जणांनी आपण प्रवेशच घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी बंडू तळवेकर यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. पण प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झाली नव्हती.
MLA Chainsukh Sancheti : पाणीपुरवठ्यात दिरंगाई; आमदार संचेती आक्रमक
प्रवेश झाला त्या दिवशी आपण रविभवनात गेलोदेखील नाही. असे असतानाही आपल्यासह पाच माजी नगरसेवकांनी प्रवेश घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. बातमी वाचताच यांच्यापैकी काहींनी बंडू तळवेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तळवेकर यांनी उडवून लावल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षप्रवेश सोहळ्यासाठी शिंदेसेनेचे शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, पूर्व विदर्भाचे संघटक यापैकी कुणालाही कळविण्यात आले नव्हते, हे विशेष.