Shivsena symbol controversy : शिवसेना चिन्ह गोठवले जाण्याचीही शक्यता, सुनावणी पुढे ढकलली !

Aseem Sarode predicts the possibility of the Shivsena symbol being frozen : असीम सरोदेंचं धक्कादायक भाकीत; उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का

New Delhi : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला सत्तासंघर्षाचा खटला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात लांबणीवर पडला असून या प्रकरणातील अंतिम निकालासाठी प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येण्याची अपेक्षा होती, मात्र सुनावणीच पुढे ढकलण्यात आल्याने उद्धव ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या शुक्रवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा खटला आज निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, अशी आशा होती. विशेषतः महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा थेट परिणाम महापालिकांमधील सत्तासमीकरणांवर होणार होता. मात्र, आज पुन्हा एकदा केवळ तारीखच मिळाल्याने राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

CM visit to Davos : दावोसला जाऊन मंत्र्याच्याच कंपनीसोबत करार?

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, आज निकाल येण्याची पूर्ण अपेक्षा होती, मात्र साडेतीन वर्षे उलटूनही केवळ तारखाच दिल्या जात आहेत. पुढील सुनावणी २३ तारखेला असून त्या दिवशी निकाल लागण्याची शक्यता असली तरी खात्री देता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असीम सरोदे यांनी या प्रकरणाबाबत धक्कादायक भाकीत करत सांगितले की, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिले जाऊ शकते, मात्र ते पूर्णपणे गोठवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. चिन्ह गोठवले गेल्यास आतापर्यंत त्या चिन्हावर निवडून आलेले खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी यांचे भवितव्यही प्रश्नात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Vijay Darda : दर्डा म्हणाले, सुधीरभाऊ प्राऊड ऑफ यू… वुई लव्ह यू!

या सुनावणीला विलंब होण्यामागे सॉलिसिटर जनरल यांची इतर प्रकरणांतील उपस्थिती कारणीभूत ठरली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. याआधी न्यायालयाने २१ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी घेऊन पाच तास युक्तिवाद ऐकण्याचे संकेत दिले होते आणि त्यानंतर तात्काळ निकाल जाहीर होईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही.

दरम्यान, सकाळीच असीम सरोदे यांनी सुनावणी होण्याबाबत शंका व्यक्त केली होती. दुपारी एक वाजल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या विशेष खंडपीठासमोर अरावली डोंगर रांगेसंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने शिवसेना सत्तासंघर्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील प्रकरण आज होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Fake resignation : मागितलेला राजीनामाही खोटा, दिलेलाही खोटा!

शिवसेना नाव आणि चिन्हाचा हा निकाल केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून भविष्यात पक्षफुटीच्या प्रकरणांवरही मोठा परिणाम करणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. असीम सरोदे यांच्या मते, अशा प्रकारे पक्ष फोडण्याची प्रक्रिया भविष्यात भाजपसाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या प्रकरणावर स्पष्ट आणि अंतिम निर्णय येणे अत्यंत गरजेचे असून आता संपूर्ण राजकीय वर्तुळाची नजर येत्या शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागून राहिली आहे.

___