Women’s protest against cylinder price hike: गॅसदरवाढीच्या विरोधात पोहोचल्या एसडीओ कार्यालयात
Amravati घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी दर्यापूर येथे अनोखे आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला. उपविभागीय अधिकारी (एसडीओ) राजेश्वर हांडे यांना त्यांनी प्रतीकात्मक चूल भेट देत निषेध व्यक्त केला. यावेळी SDO यांना निवेदनही देण्यात आले.
केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती गॅस व उज्वला योजनेतील सिलिंडरच्या दरात प्रत्येकी ५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आता एक सिलिंडर ९०० रुपयांच्या घरात पोहोचल्याचे महिला कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये सिलिंडरचा दर सुमारे ५०० रुपये होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. या दरवाढीमुळे गृहिणींच्या स्वयंपाकघरातील खर्चाचे नियोजन कोलमडल्याचे त्यांनी सांगितले.
Amravati Airport : नामकरणाच्या मुद्यावरून पुन्हा वाद, सरकार कैचीत!
या आंदोलनाचे नेतृत्व महिला आघाडी जिल्हा प्रमुख अलका निलेश पारडे यांनी केले. त्यांच्यासोबत शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या विदर्भ अध्यक्षा प्रा. संगीता पुंडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Local Body Elections : काँग्रेसला झाली निवडणुकीची घाई; सरकारला इशारा
महिला कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “केरोसीन बंद करण्यात आले आहे. सरपणासाठी झाडे तोडण्यावर बंदी आहे. अशा परिस्थितीत सिलिंडर दरवाढ गृहिणींवर अन्यायकारक आहे. निवडणूक जाहीरनाम्यात गॅस दरवाढीबाबत दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने आम्ही ही चूल भेट देऊन सरकारला त्याची आठवण करून देत आहोत.”
आंदोलनात येवदा पंचायत समिती सर्कल प्रमुख भावना सोळंके, गायत्री नगर महिला आघाडी शाखा प्रमुख सुनीता मांडवे, उपशहर प्रमुख संगीता चवळे, कविता मालवे, विद्या बयस, संगीता बनारसे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.