Opposition-to-the-expansion-of-the-Sagwan–Sundarkhed limits-is-an-obstacle-to-development : सागवन-सुंदरखेड हद्दवाढीला विरोध म्हणजे विकासाला अडथळा असल्याची भूमिका
Buldhana जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरालगतच्या सागवन व सुंदरखेड या सेमी-अर्बन ग्रामपंचायतींचा नगरपालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव तब्बल तीन दशकांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र आता शिवसेना महिला आघाडीने या हद्दवाढीला जोरदार समर्थन देत, “हद्दवाढीला विरोध म्हणजे थेट विकासाला विरोध” असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सागवन आणि सुंदरखेड या दोन्ही गावांचा बुलढाणा शहराशी प्रत्यक्ष संपर्क असून येथील मोठा भाग शहराच्या विकास प्रक्रियेत आधीच सामील झाला आहे. तरीही ग्रामपंचायत स्वरूप कायम असल्याने तांत्रिक अधिकारी, अभियंते तसेच सफाई कामगारांची स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे मूलभूत सुविधा आणि विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या दोन्ही गावांचा पाणीपुरवठा सध्या *बुलढाणा नगरपालिका*मार्फतच केला जातो. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या ही गावे नगरपालिकेत समाविष्ट करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!
दरम्यान, हद्दवाढीला विरोध करत केलेल्या टीकेवर महिला आघाडीने विरोधकांवरही निशाणा साधला. जयश्री शेळके यांनी बुलढाणा शहरातील विकासावर टीका केली असली, तरी त्या जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी असताना त्यांनी परिसराच्या विकासासाठी नेमके काय केले, असा परखर सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. शहरात त्यांच्या पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नसताना विकासावर टीका करणे योग्य नाही, असे सांगत अशा प्रकारे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करू नयेत, असे आवाहन महिला आघाडीच्या अनुजा सावळे आणि जिजा राठोड यांनी केले.
Gram Panchayat Elections : ‘गुगल अर्थ’वर गावे अजूनही पाण्याखाली; प्रभागरचनेत तांत्रिक अडथळा
तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून सांगवन व माळविहीर परिसरासाठी प्रत्येकी सुमारे २८ कोटी रुपयांच्या अतिरिक्त पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असून त्या पूर्णत्वाकडे जात आहेत. ग्रामपंचायतीकडे साध्या मुरूम टाकण्यासाठीही निधी नसताना आमदार गायकवाड यांच्या माध्यमातून जवळपास २० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा महिला आघाडीने केला.








