Shocked to read the news of Suresh Dhas and Dhananjay Munde’s meeting : देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन आम्ही सोबत असल्याचा विश्वास देणार
Mumbai : भ्रष्टाचार, वसुली यांसारख्या अनेक गोष्टी घडल्या, पण राज्य सरकारनं ठोस कारवाई केली नाही. राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला. सुरेश धस हे तडजोड करणार नाहीत, असा माझा विश्वास आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबईत आज (१५ फेब्रुवारी) खासदार सुळे प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, डिपीडीसीमधील घोळाबद्दल मी संसदेत बोलले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शब्द दिला की याबद्दल ते चौकशी लावणार आहेत. मी पाठपुरावा करणार आहे. कोणत्याही सरकारने कोणावरही दबाव टाकून परिस्थिती लपवू नये, मी स्वतः १८ तारखेला बीडला जाणार आहे. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आम्ही सोबत असल्याचा विश्वास देणार आहे. कोणी कोणाशी लग्न आणि प्रेम करावं, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे, असे कायदे करण्यापेक्षा त्याकडं लक्ष द्यावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Devendra Fadanvis : शिवनेरी जुन्नर येथे रंगणार ‘शिवजन्मोत्सव’
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी यांच्यासोबत माझी भेट झाली आहे. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. एकदा महापालिका निवडणुकीची नक्की तारीख ठरली की, त्याचा निर्णय होईल. भाजप एकटं लढणार असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. शत प्रतिशत अशी टॅगलाईन अमित शाह यांनी यापूर्वी दिली आहे. लोकशाहीत नाराज असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे .काय चुकलं काय नाही, हे लक्षात घ्यायला हवं, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. एवढं बहुमत मिळालं आहे. पण वाचाळवीरांची संख्या अधिकच वाढत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावले जातात. पण त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.
Eknath Shinde : आम्ही अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली, मात्र..
मी सहकार मंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी स्वत: बोलणार आहे. या प्रकरणी तोडगा काढावा अशी विनंती करणार आहे. मागेदेखील पीएनबी बँकेत घोटाळा झाला होता. सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. यावर योग्य तो मार्ग निघावा यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.








