Shrikant Shinde got angry when asked about the Sumit facility : सुमित फॅसिलिटी संदर्भात प्रश्न येताच भडकले श्रीकांत शिंदे
Kolhapur : झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणातील आरोपी अमित साळुंखेच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमित साळुंखे याच्यावर 800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राऊत यांनी आरोप केला की, या घोटाळ्यातील पैसा ‘श्रीकांत शिंदे फाउंडेशन’कडे वळवण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूर दौऱ्यावर असताना श्रीकांत शिंदे यांनी या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं. कोण संजय राऊत? मी कोणत्या संजय राऊतला ओळखत नाही. जो रोज उठून कुठलाही पुरावा न देता आरोप करतो, शिव्या देतो. याला तुम्ही दुसऱ्या बाजूनेही तपासलं पाहिजे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, पुरावे असतील तर समोर आणावेत. केवळ आरोप करणे हे चुकीचं आहे.
Sudhir Mungantiwar : सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊबद्दल नितांत आदर !
दरम्यान, अमित साळुंखे याला झारखंड एसीबीने अटक केली असून, तो पुण्यातील सुदर्शननगर येथील रहिवासी आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील दारू घोटाळ्यात अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये त्याची थेट भूमिका असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजकीय आरोप – प्रत्यारोपांच्या दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या निवडणूक तयारी विषयी भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढणार असून, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
______