Government ignoring Marathi school issue : साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा आरोप, विद्यार्थी संख्या घटली
Amravati राजधानी मुंबईतच मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारांनी घटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याच काळात ४० मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मराठी भाषा धोरण स्वीकारलेल्या महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री यांना पाठवलेल्या पत्रात डॉ. जोशी यांनी विचारले आहे की, “मराठी शासनाचे काम मराठी शाळा वाचवण्याचे की बंद पाडण्याचे?” तसेच बंद पडलेल्या मराठी शाळांची एकूण संख्या आणि त्या पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, हेही त्यांनी स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
Local body elections : महाराष्ट्रात राजकीय यात्रांची जत्रा, ‘स्थानिक’मध्ये कुणाचा ‘बाजार’ उठणार?
हिंदी सक्ती, मराठी शाळा बंद – सरकारचं दुटप्पी धोरण?
डॉ. जोशी यांनी सरकारवर आरोप केला आहे की, एकीकडे सरकार हिंदी आणि तिसरी भाषा सक्ती करण्याचा आग्रह धरते, तर दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडते. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेची सक्ती नाही, तरीही राज्य सरकार त्याचा गैरवापर करते,” असा आरोप त्यांनी केला.
Three students drown in Wainganga river : मुनगंटीवारांचा एक फोन अन् मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी!
“राष्ट्रीय धोरण मातृभाषेत शिक्षणाचा आग्रह धरते, पण सरकार पटसंख्या कमी असल्याचे कारण देत मराठी शाळा बंद करते आणि २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरवते. या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही सरकार आपली भूमिका बदलत नाही,” असेही डॉ. जोशी यांनी नमूद केले.