People protest against threats to MLA : अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे दिली ठार मारण्याची धमकी
Buldhana आमदार श्वेता महाले यांना अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे चिखली शहर आणि तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने चिखली पोलिस ठाण्यावर दाखल झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून आरोपीचा तातडीने शोध घेण्याची आणि महाले यांचे संरक्षण वाढविण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केल्याचे सांगितले.
International Year of Cooperation : सहकार क्षेत्राचा शेतीला आधार, जोडधंद्यांनाही सहकार्य!
दुपारी साडेतीन वाजता खामगाव चौफुली येथे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. खामगाव, बुलढाणा आणि मेहकरकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत झाली. या धमकीमुळे जिल्ह्यातील वातावरण अधिक तापले आहे. हा प्रकार राजकीय कटाचा भाग असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
United Forum of Bank Unions : बँक कर्मचाऱ्यांनी उगारले संपाचे हत्यार!
आमदार महाले यांच्या विकासकामांमुळे काही जण नाराज आहेत. त्यांना राजकारणातून संपविण्यासाठीच हे षडयंत्र रचले जात असल्याची शंका भाजपकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून खरा गुन्हेगार समाजासमोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चिखली पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.