Shyamkumar barve : काँग्रेसच्या खासदाराला ‘घरचा’ आहेर, स्वतःचीच नगरपंचायत गमावली

Congress lost nagarpanchayat in MP’s town : लोकसभेत महायुतीला दिला होता धक्का, कन्हान कांद्रीच्या निकालाची चर्चा

Nagpur रामटेक लोकसभा मतदारसंघात धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना आपल्या गावातील नगर पंचायत मात्र राखता आली नाही. त्यांचे मूळ गाव असलेल्या कन्हान कांद्री नगर पंचायतमध्ये काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. येथून भाजपचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुजित पानतावने यांनी मोठा मताच्या फराकने निवडणूक जिंकली आहे.

खासदारांच्या कन्हान कांद्री नगर पंचयातमध्ये भाजपचे १४ तर काँग्रेसचे केवळ तीनच नगरसेवक निवडून आले आहेत. बर्वे यांचे घर ज्या वार्डात आहे तेथेही भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. ही काँग्रेस आणि खासदारासाठी मोठी नामुष्की मानली जाते. लोकसभेच्या निवडणुकीत श्यामकुमार बर्वे यांचे नाव ऐनवेळी जाहीर करण्यात आले होते. त्यांचा पत्नीला आधी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र जात वैधता प्रमाणपत्राची अडचण आल्याने त्यांच्या ऐवजी श्यामकुमार बर्वे निवडणूक लढले होते.

Municipal election : राज्यातील 23 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचा अपवाद वगळता सर्वांनी बर्वे यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र केदार ठाम राहिले. त्यांनी संपूर्ण निवडणूक अंगावर घेतली होती. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी यावर नाराजी व्यक्त करून बंडखोरी केली होती. भाजपने माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता.

Shalinitai Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे निधन

भाजपने उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यासाठी जोर लावला होता. यात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर होते. मात्र शिंदे सेनेने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. शेवटी पारवे उमेदवार आणि चिन्ह धनुष्यबाण यावर महायुतीचे एकमत झाले. एवढे सारे करूनही महायुतीच्या पदरी पराभवच पडला. श्यामकुमार बर्वे यांनी बावकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून सुमारे १७ हजार मतांची आघाडी घेतली होती. नगर पंचायतच्या निवडणुकीत भाजपने या पराभवचा बदला घेतला आहे.

खासदारांच्या गावातील नगर पंचयात त्यांच्या हातून हिसकावून घेतली. खासदार होण्यापूर्वी श्यामकुमार बर्वे हे ग्राप पंचयात सदस्य होते. त्यांच्या पत्नी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.