Request to readmit Rajendra Mulak to Congress : राजेंद्र मुळक यांना काँग्रेसमध्ये परत घेण्याची विनंती
Nagpur काँग्रेसमधून निलंबित माजी मंत्री राजेंद्र मुळेक यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामकुमार बर्वे यांना पत्र लिहून यासंदर्भातील विनंती केली असल्याचे त्यांनी स्वतःच कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
विधानसभा निवडणूकीत बंडखोरी केल्यामुळे पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेले राजेंद्र मुळक यांना परत काँग्रेसमध्ये घेण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात शनिवारी निरीक्षक माजी मंत्री रणजीत कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. यात ही मागणी समोर आली.
काँग्रेसचे पदाधिकारी दयाराम भोयर, गंगाधर रेवतकर यांनी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना पक्षात परत घेण्याची मागणी केली. यावर खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबत पत्र देऊन विनंती केली असल्याचे सांगितले. यावेळी कांबळे यांंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
MLA Manoj Kayande : चांदणी तलाव विकासात पुरातत्त्व खात्याचा अडथळा
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असतानाही भाजप जिल्हा स्तरावर तोडफोडीचे राजकारण करीत आहे. ग्राऊंड लेव्हलवर भाजपला जनसामान्यांचे समर्थन नाही, हे भाजप नेत्यांना चांगलेच ठावूक आहे. भाजप ताकदवर असती, तर काँग्रेसचे लोक चोरून त्यांनी आपले राजकारण चालवले असते का, असा बोचरा सवाल त्यांनी केला. काँग्रेसला हरविण्याची भाजपमध्ये ताकद नाही. आपण संघटितपणे लढलो, तर पुन्हा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. ईव्हीएमवर दोष देऊन चालणार नाही.
Bacchu Kadu : शेतकऱ्यांना जात-धर्म नसतो, पण अन्याय मात्र ठरवून होतो
आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करा. जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट कुणाला एकाला मिळेल, पण सर्वांनी मिळून काम करा. आपल्यात फूट पडू देऊ नका, असा सल्लाही कांबळे यांनी दिला. बैठकीला माजी मंत्री सुनील केदार, खा. श्यामकुमार बर्वे, आ. संजय मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर, माजी अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, तक्षशिला वाघधरे, अवंतिका लेकुरवाळे, प्रसन्ना तिडके, कार्याध्यक्ष अश्वीन बैस, तुळशीराम काळमेघ आदी उपस्थित होते.