Breaking

Siddharth Kharat : विकासात राजकारणाला Scope नाही!

Politics has no scope in developmental Project : मेहकर नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत आमदारांची भूमिका

Buldhana राज्यात महायुतीचं सरकार आहे. पण आमदार उद्धव गटाचे आहेत. अशा परिस्थितीत विकासकामे होणार नाहीत किंवा रोखून धरली जातील, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. पण मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विकासकामांमध्ये राजकारणाला जागा नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नगरपरिषद कार्यालयात खरात यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे, काँग्रेस पार्टीचे मेहकर पक्षनेते ॲड अनंतराव वानखेडे, ॲड.संदीप गवई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष निसार अन्सारी, ऋषी जगताप, प्रशासक तथा मुख्याधिकारी रामराजे कापरे, कार्यालय अधीक्षक अजय सैताने, मेहकर उपस्थित होते.

Buldhana NCP : जिल्हाध्यक्षांवर अपमानास्पद वागणुकीचा आरोप

मेहकर शहरातील सर्वांगिण विकासासाठी राजकारण बाजूला सोडून सर्वांनी पुढाकार घ्यावा. अधिकारी कर्मचारी यांनी कल्पकतेने सुंदर शहर बनविण्यासाठी नागरिकांशी समन्वय ठेवावा. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मधिल छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक जूनपर्यंत पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच नगर परिषद हद्दीतील चालू कामांचा आढावा घेतला. मेहकर शहराच्या विकासामध्ये जास्तीची भर कशी पडेल यासाठी कामे प्रस्तावित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मेहकर शहरांमध्ये स्वच्छता ही उत्तम प्रकारे होईल याबाबत नियोजन करून कारवाई करावी. मेहकर शहराच्या सौंदर्यीकरण मध्ये भर पडेल यासाठी नाविन्यपूर्ण कामे प्रस्तावित करावी. श्री शिवाजी उद्यान येथील सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे. तसेच शहरातील इतर ठिकाणी सुरू असलेली कामे सुद्धा तातडीने पूर्ण करण्यात यावी. बस स्थानकाची नियमित स्वच्छता ठेवावी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे. नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी कारवाई करावी.

Dada Bhuse : शिक्षणाचा मान वाढवा, शिक्षकांचा सन्मान होईल!

मेहकर शहरांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी हायमस्ट लाइट्स ची व्यवस्था करण्यात यावी, माढा विकास योजनेअंतर्गत जागेच्या उपलब्धते बाबत सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. नगरपरिषद च्या अडचणी व समस्या आमदार खरात यांनी जाणून घेतल्या. विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असल्यास मागणी करावी, असंही त्यांनी सांगितलं.