Breaking

Siddharth Kharat, Sanjay Raimulkar : आजी-माजी आमदार एकाच व्यासपीठावर!

Leaders accusing each other came on same platform : टीका करणारे म्हणतात, ‘विकासकामांत राजकारण नको’

Buldhana माजी आमदार संजय रायमुलकर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात वेगवेगळ्या पक्षांत आहेत. एकमेकांवर सातत्याने टीकाही करीत असतात. पण गेल्या काही दिवासांपासून दोघेही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले दिसत आहेत. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रशासनाने जनतेच्या हितासाठी अधिक कार्य करावे. विकासकामांमध्ये राजकारण आणू नये, असे माजी आमदार रायमुलकर म्हणाले. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी आहे, की निव्वळ योगायोग आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Ajit Pawar : कुठल्याही परिस्थितीत खेळाची मैदाने खेळासाठीच वापरा !

आपल्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, वाहन परवाना डिजिटल करण्यात आले असेल. तरीही शेतकऱ्यांच्या सातबारा आणि मालकी हक्काबाबत एकसूत्रता नव्हती. मात्र, Farmer unique Id ‘फार्मर आयडी’मुळे शेतकऱ्यांच्या नोंदी अधिक सुटसुटीत झाल्या आहेत. मेहकर तालुक्यात २७ हजार आणि लोणार तालुक्यात १९ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.

अँग्रीस्टॅकच्या अंतर्गत ‘फार्मर आयडी रजिस्ट्रेशन’ तसेच ‘जनजागृती पंधरवडा’ या कार्यक्रमाचा समारोप २१ फेब्रुवारी रोजी मेहकर तहसील येथे झाला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी बोलताना सांगितले की, या योजनेमुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास सुलभता मिळेल. पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान आणि विविध पीक अनुदान यांचे फायदे थेट शेतकऱ्यांना मिळतील.

Sanjay Nirupan : मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ हिंदूंना अल्पमतात करण्याचा डाव !

मेहकर आणि लोणार तालुक्यातील घरकुल योजनांमधील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परता दाखवावी, असे निर्देश आमदार खरात यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय रायमुलकर, उपविभागीय अधिकारी जोगी, तहसीलदार निलेश मडके, जयचंद बाठीया, माजी नगरसेवक शैलेश बावस्कर, गटविकास अधिकारी देशमुख, तसेच प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते.