Siddharth Kharat, Sanjay Raymulkar : मेहकरमध्ये राजकीय कटुता बाजूला; आजी-माजी आमदार एकाच पंगतीत

mehkar-mla-siddharth-kharat-and-ex-mla-sanjay-raymulkar-together-at-deulgaon-sakarsha : श्रेयवादाच्या वादात ‘महाप्रसादा’ने साधला संवाद; सिद्धार्थ खरात आणि संजय रायमुलकर एकाच मंचावर

Mehkar अलीकडील विधानसभा निवडणुकीत झालेल्या उलटफेरानंतर संजय रायमुलकर यांचा पराभव करत उद्धवसेनेचे सिद्धार्थ खरात आमदार झाले. निवडणुकीनंतर काही काळ दोन्ही नेत्यांमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकीय चुरसही पाहायला मिळाली. मात्र, अलीकडील एका धार्मिक कार्यक्रमाने या राजकीय वातावरणाला वेगळे वळण दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देऊळगाव साकर्शा येथे संत नारायणपुरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले होते. परंपरेनुसार, उपस्थितांना आमदारांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा मान दिला जातो. अनेक वर्षे हा मान तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांना मिळत होता; मात्र यंदा विद्यमान आमदार म्हणून तो मान सिद्धार्थ खरात यांना मिळाला.

Vijay Wadettiwar : अजित पवारांच्या विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ खराब? विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘दाल मे कुछ काला है!’

महाप्रसाद वाटपाच्या वेळी पंगतीत बसलेल्या माजी आमदार रायमुलकर यांनाच प्रसाद देण्याचा प्रसंग उद्भवल्याने उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आधीच दोघांतील राजकीय श्रेयवाद चर्चेत असताना, हा क्षण दोघांनीही अत्यंत मिश्कीलपणे आणि सौहार्दाने हाताळला. राजकारणापलीकडील परस्पर आदराची ही झलक उपस्थित भाविकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय ठरली.