Siddharth Kharat, Sumit Wankhade and Gopichand Padalkar spoke about the injustice being done to farmers : सिद्धार्थ खरात, सुमीत वानखडे आणि गोपीचंद पडळकरांनी सांगितले शेतकऱ्यांवर सुरू असलेले अन्याय
Mumbai : जंग जंग पछाडूनही शेतीला पाणी मिळाले नाही म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नागरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला. सिद्धार्थ खरात यांनी आज हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांचे पत्र लिहून ठेवल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.
आज (१७ मार्च) सभागृहात बोलताना आमदार नागरे म्हणाले, कैलास नागरे याने शेती आहुती मागते, अशी नोंद करून आत्महत्या केली. शेतीला पाणी नाही. मी केलेली मागणी पूर्ण होत नाही. शेवटी खचून शून्य झालो आहे. परिवाराला शून्य करून जात आहे, अशी चार पानाची नोट लिहून नागरेंनी आत्महत्या केली. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तीन मुलांचे पालकत्व स्वीकारावे आणि पत्नीला नोकरी द्यावी, अशीही विनंती नागरेंनी पत्रामध्ये केली आहे. १४ गावांच्या पाण्याचा प्रश्नही सोडवण्यात यावा, असेही पत्रात लिहिलेले आहे.
Dr. Pankaj Bhoyar : अरे बाप रे! एवढ्या समस्या? पालकमंत्रीही दमले!
आमदार सुमीत वानखडे यांनी म्हाताऱ्या आदिवासी शेतकऱ्यावर झालेला अन्याय सांगितला. ते म्हणाले, ६५ वर्षीय म्हाताऱ्या शेतकऱ्याला तळहातावर पाय ठेऊन लाथा बुक्क्यांनी आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. आरोपी त्यांना जंगलात घेऊन गेले. दिवसभर जंगल फिरवले. मानसीक छळ केला. हा शेतकरी जेव्हा पत्नीसोबत खरांगणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेला. तेव्हा त्यांची तक्रार घेतली गेली नाही.
मी स्वतः कॉल करूनही दखल घेतली नाही. या गरीब शेतकऱ्याचा मुलगा सैन्यात आहे. सीमेवर तो देशाचे रक्षण करतो. त्याच्या कुटुंबावर अत्याचार झाला. पण पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत. सभागृहात मुद्दा उचलेल असे मी सांगितले तरीही गुन्हा दाखल केला नाही. सैन्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कॉल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण अॅट्रोसीटीची कलम लावण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, असे आमदार वानखडे म्हणाले.
विधानसभेचे सदस्य कारवाई करण्यास विनंती करतात. सरकारकडून त्याची दखल जर घेतली जात नसेल तर हे योग्य नाही. उद्या (१८ मार्च) उद्या हक्कभंग सादर करा. मी स्वतः परवानगी देऊन प्रस्ताव समितीकडे पाठवतो, असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी सुमीत वानखडे यांना दिले.
Amravati Belora Airport : बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव?
१० मार्च २०२५ ला हिंगोली जिल्ह्यातील वासंबा येथे गावशिवेवर शीव रस्ता काढून देण्यासाठी मंडळ अधिकारी, नाईक तलाठी सैय्यद आणि इतर दोन कर्मचारी देण्यासाठी गेले होते. तेव्हा अजित प्यारेवाले, बिलाल प्यारेवाले, रमजान प्यारेवाले, अयुब प्यारेवाले अन्य ११ जणांनी तलवारी, रॉड व काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रगती मदल ढाले. प्रफुल ढाले. वनिता भारत ढाले हे गंभीर जखमी झाले. हे सर्व चार पाच दिवसांपासून नांदेडमधील संजीवनी हॉस्पीटलमध्ये भरती आहेत. या प्रकरणात फक्त कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. ज्यांची डोकी फुटली त्यांच्यावरही ३०७ दाखल केला. या आरोपींच्या हद्दपारीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना एसपींना द्याव्या, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.