Government Work was conducted sitting in a bar : सुटीच्या दिवशी प्रशासकीय फायलींवर केल्या सह्या
Nagpur : शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणत्या मातीचे बनले आहेत, हे कळायला मार्ग नाही. यांची हिंमत किती वाढली आहे, याची प्रचिती देणारी उदाहरणे नेहमीच समोर येत असतात. आजही असाच एक प्रकार समोर आला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी चक्क बारमध्ये बसून शासकीय फाईलींवर सह्या करण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. यामुळे उपराजधानीत एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर शहरातील मनीष नगर भागातील एका प्रसिद्ध बारमध्ये दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तीन लोक बारमध्ये आले. त्यांच्यासोबत फाईलींचा एक मोठा गठ्ठा होता. टेबलवर बसताच त्यांनी दारूची ऑर्डर दिली अन् त्यानंतर टेबलावर शासकीय फाईलींचा गठ्ठा उघडला आणि फाईलींची पडताळणी करण्याक सुरूवात केली. मात्र हे अधिकारी कोण आणि कोणत्या विभागाचे आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही. या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. सीसीटीव्ही तपासल्यास हे महाभाग कोण, हे कळू शकणार आहे.
Tribal Pardhi Society : धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजावर पोलिसांचा अन्याय
या तिघांमधील एक जण दारूचे घोट घेत शासकीय फाईली पडताळना दिसतो आहे. रविवारी सुटीच्या दिवशी हे तिघे कोणते महत्वाचे काम करत होते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दारूचे घोट घेत शासकीय कामकाज करणारे हे महाभाग समाजासमोर येतील का, असा प्रश्न समाज माध्यमांवर विचारला जात आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन रविवारी दुपारचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास बारमध्ये काम करणारे ‘कर्तव्यदक्ष’ अधिकारी कोण होते आणि त्यांनी कोणत्या महत्वाच्या फाईलींवर सह्या केल्या, हे कळू शकणार आहे. आता पोलिस या प्रकरणात कितपत लक्ष घालतात आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.