Sikander Sheikh : सिकंदर शेख ‘महाराष्ट्र केसरी’ ते शस्त्रांची तस्करी!

A man who left the army and got caught up in crime : आर्मीची नोकरी सोडून गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकला

Mumbai : महाराष्ट्र केसरी किताब पटकावून राज्याचं नाव उज्ज्वल करणारा पैलवान सिकंदर शेख आता शस्त्र तस्करीच्या प्रकरणात अडकल्याने क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील मोहाली पोलिसांनी सिकंदर शेखसह चार जणांना अटक करून आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश केला आहे. वडिलांनी हमाली करून वाढवलेल्या आणि कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये घाम गाळून उभं राहिलेल्या सिकंदरचा हा गुन्हेगारी प्रवास समाजाला हादरवणारा ठरला आहे.

मोहाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी कुप्रसिद्ध पापला गुज्जर टोळीशी संबंधित आहेत. अवैध शस्त्रास्त्रे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून मिळवून ती पंजाबमधील विविध गुन्हेगारी टोळ्यांना पुरवली जात होती. सिकंदर शेख कथितरित्या स्थानिक नेटवर्कसाठी शस्त्र खरेदी करण्याच्या उद्देशाने मोहालीला गेला होता.

एअरपोर्ट चौकाजवळील गोपाल स्वीट्स इथं व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई करून त्याला यूपीमधील दानवीर आणि बंटी यांच्यासह अटक केली. या कारवाईत पाच पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

Satyatacha morcha : ‘सत्याचा मोर्चा’ला सुरूवात; राज, उद्धव ठाकरे, शरद पवार एकत्र

या संपूर्ण प्रकरणातून पोलिसांना संशय आहे की या टोळीचे पंजाबमार्गे पैसा पाठवणाऱ्या अनेक राज्यांतील गुन्हेगारी गटांशी संबंध आहेत. अटकेतील सिकंदर शेख हा राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असून वयाच्या अवघ्या 26 वर्षांत त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्याच्यासोबत अटक झालेला दानवीर हा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी असून पापला गुज्जर टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्यावर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा आणि आर्म्स ॲक्टचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर कृष्ण कुमार उर्फ हॅपी गुज्जर हा एसएएस नगरमधील नड्डा गावचा आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, या नेटवर्कमध्ये खेळाडूंना आंतरराज्य शस्त्र व्यवहारासाठी ‘चेहरा’ म्हणून वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापेमारी सुरू असून, संपूर्ण साखळीचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरमनदीप सिंग हंस यांनी दिली आहे.

Contradictory movement : ‘सत्याचा मोर्चा’ विरुद्ध ‘मुक आंदोलन’

सिकंदर शेख हा सोलापूरचा रहिवासी असून, कोल्हापुरात त्याने कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. 2022 मध्ये महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब जिंकल्यानंतर तो क्रीडा कोट्यातून भारतीय लष्करामध्ये भरती झाला. मात्र काही महिन्यांतच त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि पंजाबमध्ये भाड्याच्या घरात राहत असल्याचं समोर आलं. पदवीधर असलेल्या सिकंदरने काही काळानंतर गुन्हेगारी जगतात पाऊल टाकलं आणि शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थ म्हणून काम केलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

Loan waiver : बिनव्याजी कर्ज मिळतंय, मग ते वेळेवर फेडायची सवय लावा !

एका साध्या हमालाच्या मुलाने मेहनतीच्या बळावर ‘महाराष्ट्र केसरी’पर्यंतचा प्रवास केला होता. पण तीच मेहनत आणि प्रतिष्ठा आता गुन्हेगारीच्या सावलीत हरवली आहे. सिकंदर शेखच्या अटकेमुळे केवळ क्रीडा क्षेत्राचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं मस्तक खालचं झालं आहे.
______