Breaking

Smart City : लता मंगेशकर उद्यानात साकारणार ‘अॅडव्हेंचर पार्क’

Adventure games will creat in Lata Mangeshkar park of Nagpur : नागपुरातील स्मार्ट, लक्षवेधी प्रकल्पांत पडणार भर

Nagpur : नागपूरच्या सूर्य नगरमधील लता मंगेशकर उद्यानातील जुने ऑडिटोरीअम तोडण्यात आले आहे. आता या मोकळ्या दोन एकर जागेवर विविध प्रकारचे १५ साहसी खेळ व अॅडव्हेंचर पार्क उभारणी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नुकतेच यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

शहरातील विद्यार्थ्यांना साहसी खेळांचा अनुभव यांवा तसेच त्यांच्यामध्ये शौर्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिकेने सूर्य नगरमधील लता मंगेशकर उद्यानात ८ कोटी ७९ लाख रुपये खर्च करून अॅडव्हेंचर पार्क निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला महानगरपालिकेने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे शहरातील स्मार्ट तसेच एका लक्षवेधी प्रकल्पामध्ये भर पडणार आहे.

Chandrashekhar Bawankude : पंचायत राज सिस्टीम भक्कम, महसूल मंत्री बावनुकळेंची माहिती !

ॲडव्हेंचर पार्क आणि आवश्यक असलेली स्थापत्य कामे, हिरवळीची कामे पूर्ण करण्यासाठी आठ कोटी ७९ लाख १६ हजार ६९४ रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्थापत्य कामे व हिरवळीकरिता चार कोटी ५८ लाख ६३ हजार ३७४ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ॲडव्हेंचर पार्कचे साहसी खेळासाठी उभारणीकरिता चार कोटी २० लाख ५३ हजार ३२० रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.

School ID scam : काय आहे ‘तुकडी घोटाळा’, अनिल देशमुखांनी सांगितले !

हा प्रकल्प शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने तसेच युवा पिढीकरिता उत्साहवर्धक व आरोग्यदायक असल्याने या प्रस्तावास विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. झिप लाईन सिंगल रोप वन वे, ॲडव्हेंचर प्ले स्टेशन, लो रोप कोर्स, क्लायमिंग वॉल ऑपरेशनल इक्विपमेंट, रॅपलिंग वॉल अँड ऑपरेशनल इक्विपमेंट, बायसिकल रोप वे (स्काय सायकल डबल), स्काय रोलर डबल अँड ऑपरेशनल इक्विपमेंट, बंगी इजेक्शन अँड ऑपरेशनल इक्विपमेंट असे विविध साहसी खेळ ॲडव्हेंचर पार्कमध्ये असतील.