A disabled couple got financial help as appealed on WhatsApp : सोशल मीडियाचा असाही करिष्मा; दिव्यांग दाम्पत्याला आधार
Yavatmal तळेगाव (भारी) येथील प्रेमिला व संजय बागडे दोघेही दिव्यांग आहेत. कष्टाची कामे करता येत नसल्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी गावातच छोटेसे किराणा दुकान थाटले. घरी दुसरा कुणीही कमावता नसल्याने या व्यवसायातून त्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी आलेल्या तोट्यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले. अशात एक व्हॉट्सअॅप आवाहन करण्यात आले. आणि काही क्षणात मदत मिळाली.
सोशल मीडियावर आवाहन करून अनेक फ्रॉड होतात. लोक संवेदनशीलता जपून मदत करतात. पण नंतर त्याचे वास्तव उघड होते. मात्र, अशा वातावरणातही एका दिव्यांग दाम्पत्याच्या आवाहनाला लोकांनी सढळ हाताने मदत केली. आपला व्यवसाय बंद पडेल ही विवंचना या दाम्पत्याला स्वस्थ बसू देत नव्हती. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र त्यांच्या मदतीला पुढे आले. संस्थेचे संदीप शिंदे यांनी व्हाट्सअॅप समूहांवर मदतीचे आवाहन केले. त्यानंतर संवेदनशील दाते पुढे आले अन् त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. अवघ्या अर्ध्या तासातच शिंदे यांना पूर्ण मदत मिळाली.
SP Dr. Harsh Poddar : 350 अनाथ व निराधार मुलं दाखवताहेत कौशल्य!
बागडे दाम्पत्याच्या वाट्याला जन्मत: शारीरिक व्यंग आले. पण ‘नंददीप’च्या आवाहनानंतर उभारणी मिळाली. समाजमाध्यमावर केलेल्या आर्थिक मदतीच्या संदेशाला प्रतिसाद देत देणगी दाते पुढे सरसावले आणि ७ हजार दोनशे रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली. सोमवारी सायंकाळी नंददीपचे संदीप शिंदे यांनी स्वतः तळेगाव (भारी) येथे जाऊन त्यांना किराणा साहित्य सुपूर्द केले.
Yavatmal Police : जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड ताब्यात
दोघेही नैराश्यात होते. मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र त्यांच्या मदतीला पुढे आले. या जोडप्याला ६ हजार रुपयांच्या ठोक किराण्याची गरज होती. त्यानुसार केंद्राचे संचालक संदीप शिंदे यांनी व्हाट्सअॅप’वर आवाहन केले. अवघ्या अर्ध्या तासातच ८ हजार १२५ रुपये गोळा झाले.