Diesel tanker overturned on Mehkar-Khamgaon road : मेहकर-खामगाव रस्त्यावरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Buldhana घटना चांगली असो वा वाईट, त्यात संधी शोधणाऱ्यांची उणीव नसते. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. एक डिझेल टँकर उलटल्यानंतर चिंता व्यक्त करण्यापेक्षा लोक डिझेल भरून घेऊन जाऊ लागले. अनेकांनी तर भांड्यांमध्ये डिझेल भरून नेले. अख्खा टँकर लोकांनी रिकामा केला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेहकर-खामगाव रस्त्यावरील गोमेधरजवळ हा विचित्र प्रकार घडला. डिझेलने भरलेला टँकर वळणावर पलटी झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी झपाट्याने धाव घेतली. टँकरमधील डिझेल डबे, कॅन आणि भांड्यांत भरून संपूर्ण टँकर रिकामा केला. या प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
MLA Randhir Sawarkar : खरीप हंगामात बियाणे-खतांचा काळाबाजार रोखा
खामगाव येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल पोहोचवण्यासाठी निघालेला टँकर (एमएच-२८ बीए-२९१६) मुंबईहून खामगावकडे येत असताना गोमेधरजवळील संगम फाट्याजवळ वळणावर पलटी झाला. चालक भगवान ताठे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. टँकर उलटताच त्यातून डिझेल रस्त्यावर सांडू लागले.
याच क्षणी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेत डिझेल भरून नेण्याची धांदल उडाली. डबे, कॅन, पातेले, बादल्या यामध्ये लोकांनी डिझेल भरत नेले. अनेक जणांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये चित्रीत केला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत टँकर रिकामा झाला होता.
या अपघातात चालक व वाहक दोघेही सुखरूप बचावले असून, स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून मदत केली. मात्र, अपघात स्थळावरील गर्दी व डिझेल उचलण्याच्या घाईमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Balwant Wankhede Yashomati Thakur : काँग्रेसचा जनता दरबार, पण समस्या कोण सोडवणार?
समाजमाध्यमांवर या प्रकाराचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी नागरिकांच्या मनमानीवर टीका केली आहे, तर काहींनी या घटनेवर विनोदी भाष्य केलं आहे.