Women volunteering for an organization that serves the mentally ill : किराणा साहित्याचे वितरण; शिंदे दाम्पत्याच्या सेवेला दातृत्वाची जोड
Yavatmal वैदिक रुद्र महिला मंडळाने आपल्या उद्देशाला अनुसरून ‘नंददीप’च्या मनोरुग्ण सेवेला हातभार लावला. त्यांनी किराणा साहित्याचे वितरण करून संचालक संदीप व नंदिनी शिंदे दाम्पत्याच्या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
मागील दहा वर्षांपासून वैदिक रुद्र महिला मंडळाकडून सामाजिक संस्थांना गरजेनुसार लागणारी मदत पुरविली जाते. बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसन करणाऱ्या नंददीप शहरी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रालाही अन्नधान्याची नड होती. त्यांची ही गरज लक्षात घेता मंडळाच्या समितीने समर्थवाडीस्थित नंददीप केंद्राला भेट दिली. तसेच किराणा साहित्याचे वितरण केले.
यामध्ये तेल, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, बटाटे तसेच मसाल्यांचा समावेश आहे. ‘सामाजिक कार्याला आमची मदत, हाच आमचा उद्देश असल्याचे मंडळाच्या ज्येष्ठ, संस्कृत अभ्यासिका अनिता महाबळ यांनी सांगितले. त्यांनी २४ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली होती. यामागे महिलांनी विविध दैवतांची विधिवत पूजा करावी, हा उद्देश आहे. यातून पुढे आलेल्या महिलांकडून अध्यात्मासोबत सामाजिक भानसुद्धा जपले जात आहे. तुमच्यासारखी लोकचळवळी लाभत असल्याने आमची मनोरुग्णसेवा निर्विवाद पुढे जात असल्याचे शिंदे याप्रसंगी म्हणाले.
Collector of Buldhana : कारागृहातील कैद्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळाव्यात
मी एक संस्कृत अभ्यासिका आहे. दिवसेंदिवस पुरोहित मिळणे कठीण होत चालले. त्यामुळे महिलांनी स्वतः वैदिक सूक्त, योग्य मंत्रोच्चार तसेच सर्व देव, दैवतांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजाअर्चा करावी, हा उद्देश बाळगला. आणि या मंडळाची स्थापना केली. यातून यजमानांनी स्वेच्छेने दिलेली दक्षिणा व स्वतःजवळील काही मदत टाकतो. त्यानंतर आम्ही अध्यात्मासोबत सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करतो. दशकभरापासून हा उपक्रम सुरु आहे. नंददीपचे संदीप व नंदिनी यांची मनोरुग्ण सेवा पाहून आम्ही भारावून गेलो त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे, असं अनिता महाबळ म्हणाल्या.