‘Ghar Ghar Samvidhan’ activity on Republic day : समाज कल्याण विभागातर्फे संविधानाचा जागर
Nagpur भारतीय संविधान अमलात येण्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने “घर घर संविधान” उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नागपूर जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय संविधानावर आधारीत 12 फुट रुंदीचा व 40 फुट लांबीचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. कस्तुरचंद पार्क, नागपूर येथून पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाची सुरुवात होणार आहे. चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी करुन जनजागृती करण्यात येणार आहे.
Crop insurance : पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
या चित्ररथाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. या संविधान जनजागृती कार्यक्रमात नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री शोभेची वस्तू नाही, बावनकुळेंचे परखड बोल
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, संविधानाची मूल्य शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाच्या भावी नागरिकांपर्यंत पोहोचावीत. त्यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.