Breaking

Somaiya vs Mushrif : सोमय्या यांना धक्का! मुश्रीफांवर केलेले आरोप निघाले बिन बुडाचे

Fraud petition against Minister Mushrif disposed of : मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधातील फसवणुकीची याचिका निकाली

Mumbai: वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप बिन बुडाचा ठरला असून याचिका निकालात निघाली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारावरून रान उठवत विविध राजकीय नेत्यांवर आरोपांची मालिका सुरू केली होती. सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. विविध पक्षात असलेल्या नेत्यांवर लगेचच इडी ने गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली. मात्र सुनावणीत सोमय्यांनी केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत. असाच प्रकार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबतीत समोर आला आहे सोमय्या यांनी यांच्या ज्यांच्या विरोधात आरोप केले त्या सगळ्यांना आता क्लीन चीट मिळताना पाहायला मिळत

Shaktipeeth mahamarg : भूसंपादनाला मंजुरी पण राज्य कर्जबाजारी होण्याचा धोका !

 

मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. कारखान्यात शेअर्स देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याचा आरोप होता. यावरून ईडीने गुन्हा दाखल केला होता. हा दाखल गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीच्या वेळी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, कागल पोलिसांनी हसन मुश्री यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरात नोंदवलेल्या तक्रारी आणि पूर्व सुचक गुन्ह्यांच्या आधार घेत अंमलबजावणी संचालनालय ईडी कडून मुश्रीफ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्री गुन्हा दाखल केला होता.

Tribal Society : यापुढे पारधी समाजावर अन्याय होऊ नये, आयोगाचे आदेश !

कागल पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त सरकारी वकील आशिष सातपुते यांनी उच्च न्यायालयात माहिती दिली की या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. कागल येथील दंडाधिकारी न्यायालयाने त्यांचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले आहे. मुश्रीफ यांची आव्हान देणारी याचिका निकाली काढण्यात आली आहे. यंत्रणेने कोणताही पुरावा नसल्याचे आणि आरोप खरा किंवा खोटा नसल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर क्लोजर रिपोर्ट दाखल केला जातो. या प्रकरणात याचिका निकाली काढण्यात आली आहे.

____