Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्यासाठी नागपुरात पेटल्या मशाली !

Nagpur Citizens Unite to Demand Sixth Schedule Status for Ladakh : लद्दाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करण्याच्या मागणीसाठी एकवटले सर्वधर्मीय नागरिक

Nagpur : लद्दाख येथील पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेचा देशभरातून निषेध केला जात आहे. त्यांच्या सुटकेसाठी यापूर्वी विदर्भातील अकोल्यासह काही जिल्ह्यांत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नागपुरातही सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सोनम वांगचूक यांच्या सुटकेसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. लोकांनी रात्रीच्या वेळी मशाल मोर्चा काढला.

वांगचूक यांच्या समर्थनार्थ नागपूरकर एकवटले आणि लद्दाखचा भारताच्या सहाव्या अनुसूचित प्रदेशात समावेश करण्याची मागणी जोर धरत असताना नागपूरकरांनी शांततामय मार्गाने वांगचूक यांच्या समर्थनार्थ आपला आवाज बुलंद केला. विविध धर्मीय आणि जवळपास सर्व समाजघटकांच्या ३००हून जास्त नागरिकांच्या उपस्थितीमुळे हे आंदोलन एकात्मतेचे प्रतिक ठरला. लद्दाखच्या सांस्कृतिक, पर्यावरण आणि राजकीय हक्कांसाठी सुरू झालेल्या या लढ्यात नागपूरकरांनीही सहभाग नोंदवला.

Sub-Registrar Office : बावनकुळेंची दुय्यम निबंधक कार्यालयात धडक, उपराजधानीत खळबळ !

 

नागपूरच्या व्हेरायटी चौकातून मशाल मार्च सुरू झाला. मार्चचा समारोप संविधान चौकात मेळाव्याने झाला. येथे सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. ‘थ्री इडीयट’ या सिनेमातील ‘फुन्सूख वांगडू’ या गाजलेल्या पात्रामागील खरी प्रेरणा वांगचूक आहेत. ते खरे नायक आहेत आणि अशा नायकाला राष्ट्रविरोधी ठरवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अशा प्रवृ्त्तींना नागपूरकरांच्या मशाल मार्चने सज्जड इशारा दिला आहे.

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ‘आखरी सवाल’

महात्मा गांधी यांच्या शांततेच्या मार्गाने वांगचूक यांनी २१ दिवसांचे उपोषण केले होते. समर्थकांनाही त्यांनी शांत राहण्याचाच सल्ला दिला होता. हिंसा झाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यांच्यासाठी ‘सोनम वांगचूक यांना मुक्त करा’ आणि ‘आम्ही लद्दाखच्या सहाव्या अनुसूचीची मागणी करतो’, अशा घोषणा भारत देशाचे हृदय असलेल्या नागपूर शहराच्या मध्यभागी गुंजल्या. शांततने निघालेला हा मोर्चा अभूतपूर्व होता. एका सच्च्या देशभक्ताची छबी जनता वांगचूक यांच्यामध्ये बघत आहे. गांधीजींचे आदर्श आणि संविधान धोक्यात आले असताना लोक आता गप्प बसणार नाही, अशा प्रतिक्रिया मशाल मोर्चानंतर नागपूरकरांनी दिल्या.