Breaking

Guardian minister Babasaheb Patil : जिल्ह्याचा विकास निधी ठरलेल्या वेळेत खर्च करा !

Spend the development fund of the district within the time in gondia : पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश; जिल्हा नियोजन आढावा बैठक

Gondia जिल्हा नियोजन समिती मार्फत करावयाच्या विविध विकास कामाचा निधी अंमलबजावणी यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामांसह निर्धारित वेळेत खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शनिवारी (25 जानेवारी) जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

सभेला खासदार डॉ.नामदेव किरसान, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ, नियोजन विभागाचे उपायुक्त अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, निमंत्रित सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Babasaheb Patil : सहकार क्षेत्राला मिळणार ‘मॉडर्न टच’ !

या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तावर सविस्तर चर्चा करून ते कायम करण्यात आले. इतिवृत्तातील जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगणासाठी/व्यायामशाळांना देण्यात येणारा निधीचा मुद्याही या बैठकीत चर्चेला आला. शाळेच्या क्रीडांगणासाठी मागणी केलेल्या सर्व प्रस्तावांना स्थगिती देण्यात येत आहे. सर्व प्रस्ताव नव्याने मागविण्यात यावे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निधी मंजूर करतांना जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात सम प्रमाणात निधी वाटप करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. लाख लागवडीसाठी जिल्हाभर नियोजन करावे असे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्र बाह्य योजना सन २०२४-२5 मध्ये यंत्रणांनी तिन्ही योजनांवर आतापर्यंत 45 टक्के निधी खर्च झालेला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना सोलरवर आणाव्यात असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

Local Government Bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आघाडी एकत्र लढवणार की स्वतंत्र?

अर्धवट योजना मार्गी लावा

सोबतच अर्धवट योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या. गडकिल्ले व पर्यटन यावरील निधी तातडीने खर्च करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

संपूर्ण जिल्ह्यात डिजिटल शाळा

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात डिजीटल शाळा उभारण्यासाठी सर्वानुमते मंजूरी देण्यात येत आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच या बैठकीत जिल्हा विकासाच्या विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंदिया शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ओबीसी वसतिगृहाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जागा उपलब्ध झाली आहे. निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.