Union minister conducted review meeting : स्थानिक निवडणुकांमध्ये फटका बसण्याची भीती
Akola शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये फुट पडली आहे. संपर्क प्रमुखाने एक दिवस आधीच आढावा बैठक घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटानेही बैठक घेऊन कार्यकर्त्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्ह्यातील कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही. सर्व निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच होतील, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर आणि अश्विन नवले यांनी या बैठकीत दिले.
केंद्रीय मंत्री तथा शिवसेनेचे संपर्क नेते प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेची आढावा बैठक अकोल्यात पार पडली. जिल्हाप्रमुख पिंजरकर, जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि महानगरप्रमुख योगेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. गेल्या दोन दिवसातील शिवसेना शिंदे गटाची ही दुसरी बैठक आहे.
Azad Maidan : सेवानिवृत्त पोलिसांचे आझाद मैदानावर आंदोलन, शासनाने घेतली दखल !
माजी आमदार तथा संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया व नवनियुक्त जिल्हाप्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली होती. त्यानंतर आता श्रीरंग पिंजरकर आणि अश्विन नवले या दोघांनी आढावा बैठक घेतल्याने अकोला जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात दोन गट पडले असल्याचे दिसून आले.
या बैठकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला. “संघटनात्मक बांधणीसाठी निष्ठेने काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही,” असे दोन्ही जिल्हाप्रमुखांनी स्पष्ट केले.
यावेळी विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. निवासी उपजिल्हाप्रमुखपदी अविनाश मोरे, कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय रोहनकर, कुटासा सर्कलचे प्रमुख विरसिंग ठाकूर, भारतीय जीवन विमा सेल जिल्हाप्रमुखपदी प्रकाश भट्टी यांची निवड झाली. तसेच प्रभाग ८ व ९ मधील अकार्यक्षम उपशहर प्रमुखांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी विशाल धोटे व रितेश दुबे यांची नियुक्ती झाली.
Shaktipeeth Highway : ‘शक्तीपीठ’ केवळ ठेकेदारांना जगवण्याचा महामार्ग, काँग्रेसचा आरोप
या बैठकीत विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये गौरव राईकवार, अक्षय येरमेकर, आशीष काळे, विनोद अग्रवाल, शशिकांत कोटरवाल, अजित वर्मा यांच्यासह सुमारे ७० ते ८० कार्यकर्त्यांचा समावेश होता.