Breaking

Sports authority of India : खेलो इंडिया प्रशिक्षकांना निम्मे मानधन !

Half salary tKhelo India coaches : वर्धा जिल्ह्यात गोंधळ; राज्यभर हाच प्रकार असल्याचा संशय

Wardha जिल्ह्यात खेलो इंडिया उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षकांना मिळणारे मानधन हा एक गंभीर विषय बनला आहे. केंद्र शासनाच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळाडूंना प्राथमिक स्तरावरील क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी खेलो इंडिया केंद्रे स्थापित केली आहेत. या केंद्रांमध्ये प्रशिक्षकांना प्रति महिना 25000 रुपये मानधन देण्याचे निर्देश आहेत. परंतु वर्धा जिल्ह्यात हे मानधन निम्मे दिले जात आहे. यामुळे प्रशिक्षक आणि पालकांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे.

वर्धा जिल्हा क्रीडा संकुलात सुरू करण्यात आलेल्या केंद्रात प्रशिक्षकांची नियुक्ती त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आली आहे. या प्रशिक्षकांना 13000 रुपये मानधन दिले जाते. जे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या मानधनाच्या अर्ध्याहूनही कमी आहे. शासनाकडून थेट प्रशिक्षकाच्या खात्यावर मानधन अदा करण्याचे निर्देश आहे. असे असताना जिल्हा क्रीडा विभागाकडून त्रयस्थ संस्थेमार्फत मिळणाऱ्या मानधनात 10 टक्के कपात करून दिले जात आहे.

Buldhana Jijau Birthplace : जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी पवळ सरसावले !

एप्रिल 2024 पर्यंत ही पद्धत चालू होती, परंतु काम करूनही पाच महिन्यांचे मानधन न दिल्याने प्रशिक्षकांनी वारंवार मागणी केली, परिणामी त्यांना 1 ऑक्टोबर 2024 ला कार्यमुक्तीचे पत्र देण्यात आले.

Anil Deshmukh : वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही ?

प्रशिक्षकांनी या संदर्भात विचारणा केली असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. डिसेंबर 2024 पर्यंतचे वेतन नियुक्त प्रशिक्षकाच्या नावाने निघाल्याचे पत्र हाती लागले. त्यामुळे क्रीडा विभागात काहीतरी घोळ सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. हा प्रकार फक्त वर्धा जिल्ह्यातच नसून संपूर्ण राज्यात सुरू असल्याचेही बोलले जात आहे. पालकांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.